Bendur | (Photo Credit: Representative image)

Maharashtrian Bendur 2020 Images:  अलिकडे कोणताही सण असेल तर त्याच्या शुभेच्छा देण्याची टूम निघालेलीच आहे. त्यामुळे अनेक मंडळी बैलपोळा किंवा बेंदूर सणानिमित्त शेतकऱ्यालाही शुभेच्छा देतात. पण, खऱ्या शुभेच्छा बैलाला द्यायला हव्यात. काहींना असे वाटू शकते की बैलाला शुभेच्छा दिलेल्या थोड्याच कळणार आहेत? पण, आपण त्याचा सण साजरा करतो आहोत हे तरी त्याला कुठे कळणार आहे. त्यामुळे बेंदूर सणाच्या शुभेच्छांचा खरा मानकरी हा बैलच आहे. बैलाला खूप खूप शुभेच्छा. बैलावर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांसाठी इथे काही Images, WhatsApp Status ठेवण्यासाठी इमेजेस देत आहोत.

शेतकऱ्यांसाठी आणि प्रामुख्याने त्याच्या बैलांसाठी महत्त्वाचा असणारा महाराष्ट्रीय बेंदूर हा सण यंदा आषाढ शु. 14 म्हणजेच 14 जुलै या दिवशी आहे. खरे तर हा सण शेतकरी साजरा करतो पण तो स्वत:चा सण म्हणून नव्हे. आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बैलाचा सण म्हणून. अनेक भागांमध्ये म्हणूनच कदाचित या सणाला बैलपोळा म्हटलं जात असावं.

बेंदूर सणासाठी Images, WhatsApp Status

Bendur | (Photo Credit: Representative image)

बेंदूर सणासाठी Images, WhatsApp Status

Bendur | (Photo Credit: Representative image)

Maharashtra Bendur 2020 Date: महाराष्ट्रातील बेंदूर सण माहिती, महत्व, साजरा करण्याची पद्धत - Watch Video

बेंदूर सणासाठी Images, WhatsApp Status

Bendur | (Photo Credit: Representative image)बेंदूर सणासाठी Images, WhatsApp Status

Bendur | (Photo Credit: Representative image)

बेंदूर सणासाठी Images, WhatsApp Status

Bendur | (Photo Credit: Representative image)

बैलाची महती सांगणारे हे शाहीर दादा कोंडके यांचे गीत

आपण वर ऐकलेले गाणे हे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांच्या 'मला घेऊन चला' या चित्रपटातील आहे. दादा कोंडके यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या चित्रपटात ते स्वत:च अभिनेत्याच्या प्रमुख भूमिकेत असत. तसेच, त्यांनी अभिनय केलेले बहुतांश चित्रपट हे त्यांनी म्हणजे दादा कोंडके यांनीच दिग्दर्शित केले आहेत. दरम्यान, जोडी बैलाची खिल्लाही हे गीत स्वत: दादा कोंडके यांनीच लिहिले आहे. तसेच हे गीत महेंद्र कपूर यांनी गायले आहे. तर, राम-लक्ष्मण यांचे या गीताला संगित लाभले आहे.