Mahashivratri 2022 HD Images: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे.महाशिवरात्री म्हणजे शिव शंकराचा मुख्य उत्सव. या दिवशी भगवान शिवने पार्वती देवीशी लग्न केले होते. महाशिवरात्री हा वर्षातील 12 शिवरात्रांमध्ये सर्वात महत्वाचा मानला जातो. तर आज (1 मार्च) महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रिचा पवित्र सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो. तसेच माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी 'महाशिवरात्र' म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्या दिवशी व्रताची सांगता करतात.
'महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र/कालरात्री असेही म्हटले जाते. तर यंदाच्या महाशिवरात्री निमित्त Wishes, Messages, WhatsApp Status, Facebook Post शेअर करुन द्या मित्रपरिवाराला शुभेच्छा!
या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे इ. गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो.