
गणेशभक्तांसाठी महत्त्वाच्या असणार्या सणांपैकी एक म्हणजे माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti). गणेश जयंती हा दिवस म्हणजे गणरायाचा जन्मदिन. त्यामुळे काही गणेशभक्त भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे गणेश जयंतीला देखील घरोघरी दीड दिवसांच्या गणेशमूर्तीची स्थापना करतात. या निमित्ताने गोडाधोडाचं जेवण बनवून गणेश जयंती साजरी करतात. मग यंदा माघी गणेशोत्सव कशी आहे? गणेश जयंतीची तारीख काय आहे हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर जाणून घ्या त्याचं उत्तर! हे देखील नक्की वाचा: Maghi Ganesh Jayanti 2022 Invitation Card Format: माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी Messages, HD Images!
यंदा माघी गणेश जयंती कोणत्या दिवशी?
माघी गणेश जयंती हा दिवस माघ शुद्ध चतुर्थी दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे यंदा हा दिवस 4 फेब्रुवारी, शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. माघी गणेश जयंतीचा दिवस तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील साजरा केला जातो.
दाते पंचांगानुसार, गणेश चतुर्थीची सुरूवात 4 फेब्रुवारीला 4.40 पासून होत असून समाप्ती 5 फेब्रुवारीला सकाळी 3.47 ला होणार आहे. दरम्यान गणेश जयंती साठी 4 फेब्रुवारीला सकाळी 11.30 पासून दुपारी 1.41 पर्यंत गणेश पूजनाचा मुहूर्त चांगला असल्याचं मानलं जात आहे.
हिंदू शास्त्रानुसार गणरायाची माता पार्वती यांनी श्री गणेशाची रचना उबटनाने केली होती. त्यानंतर त्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली होती. तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता. त्यामुळे जी व्यक्ती या दिवशी भगवान गणेशाची पूजा करेल त्याला सुख, शांती, समाधान प्राप्त होईल. त्याच्या सार्या इच्छा पूर्ण होतील असं मानलं जातं.