Maghi Ganesh Jayanti 2022 Invitation Card Format: माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाला आमंत्रित करण्यासाठी  Messages, HD Images!
माघी गणेश जयंती । File Photo

माघी गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti) देखील महाराष्ट्रात भाद्रपद गणेश चतुर्थी प्रमाणेच जोशात साजरी करण्याची पद्धत आहे. यंदा माघी गणेश जयंती 4 फेब्रुवारी दिवशी आहे. पण अद्यापही कोरोनाचं सावट असल्याने मोकळ्या वातावरणामध्ये आणि पूर्वीप्रमाणे धामधुमीत सण साजरा करण्याला 100% मुभा नाही. पण सारे एकत्र मिळून हा सण समारंभ साजरा करू शकत नसलो तरीही आता इंटरनेट मुळे व्हर्चुअली सण साजरा करण्याची नवी संकल्पना अनेकांनी स्वीकारली आहे. मग यावर्षीदेखील गणेश जयंती निमित्त घरी आलेल्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन तुम्ही मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तांना सहज देऊ शकता. मग त्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यासाठी या निमंत्रण पत्रिकांचा मेसेज फॉर्मेट तुमच्या नक्कीच कामी येऊ शकेल.

कोरोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नसल्याने अनावश्यक गर्दी टाळूनच यावर्षी देखील सुरक्षित वातावरणामध्ये माघी गणेश जयंती साजरी करा. यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास तुम्हांला मदत होईल. Maghi Ganesh Jayanti Special Modak Recipes: माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बनवाल?

आमंत्रण पत्रिका नमुने

नमुना 1 

सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्याकडे माघी गणेशोत्सवानिमित्त श्रींचं आगमन होणार आहे तरीही आपण शुक्रवार 4 फेब्रुवारी 2022 दिवशी सहकुटुंब बाप्पाचं ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी यावं ही विनंती.

ऑनलाईन दर्शनाची लिंक-

वेळ- दुपारी: 12 वाजून 30 मिनिटं

आरतीची वेळ : संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटं

विनित,

माघी गणेश जयंती । File Photo

नमुना 2 

गणेश जयंती निमित्त आमच्याकडे विराजमान होणार्‍या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन भेटा आणि आरती मध्येही सहभागी व्हा!

ऑनलाईन दर्शन

वेळ -

तारीख-

आमंत्रित

माघी गणेश जयंती । File Photo

माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक या सणानिमित्त तीळाच्या सारणाने देखील बनवले जातात. माघी गणेशजयंतीच्या दिवशी दीड दिवस घरी बाप्पाची मूर्ती विराजमान करून त्याची षोडोपचार पूजा करण्याची पद्धत आहे.