Lunar Eclipse 2019: वैज्ञानिकांच्या मते चंद्र, पृथ्वी आणि सूर्य जेव्हा एका रांगेत येतात आणि चंद्रावर पृथ्वीची सावली पडते त्यावेळी चंद्रग्रहण होते असे मानले जाते. चंद्रग्रहण पौर्णिमेच्या वेळी होते. यंदाच्या वर्षी पहिले पूर्ण चंद्रग्रहण सोमवारी (21 जानेवारी) होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी सुरु होऊन 12 वाजून 21 मिनिटांनी संपणार आहे. तर ग्रहणाचा स्पर्शकाल सकाळी 10 वाजून 11 मिनिटांनी सुरु होणार असून 11 वाजून 13 मिनिटांनी संपणार आहे.
सुतक लागण्याची वेळ
चंद्रग्रहण सुरु होण्याबरोरबरच सुतकाचे ही विशेष महत्व आहे. शास्रानुसार, चंद्रग्रहणापूर्वी 9 तास अगोदर सुतक सुरु होते.
सुतक म्हणजे काय?
सुतक म्हणजे खराब वेळ. अशी वेळ जेव्हा प्रकृती जास्त संवेदनशील असल्याने कोणताही धोका होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या वेळी सावधान राहणे आवश्यक आहे. आपण दैनंदिन जीवनात काही नियमांचे पालन करतो परंतु सुतकात काही खास गोष्टींचे पालन केले पाहिजे.
सुतक लागल्यानंतर काय करु नये
सुतक लागल्यानंतर एखाद्या नवीन कामाला सुरुवात करु नये. शास्रानुसार सुतकामधील वेळ ही अपशकुन मानली जाते. तसेच सुतक लागल्यानंतर जेवण ही करु नये. हा नियम गर्भवती महिला, वयोवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींसाठी लागू होतो. तर दुध, फळे, ज्यूस किंवा सात्विक भोजन करणे. या वेळात देवाची पुजा केली जात नाही. त्यामुळेच सुतकात मंदिरे काही वेळासाठी बंद केली जातात. एवढेच नसून तुळशीच्या झाडाला हात लावू नये. तर चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहणे घातक असते. (हेही वाचा-Lunar Eclipse 2019: उद्या दिसणार 'सुपर ब्लड मून' ग्रहण, जाणून घ्या वेळ)
सुतक संपल्यानंतर करा हे उपाय
असे मानले जाते की, सुतक संपल्यानंतर तुप आणि खीर खाल्यास शुभ मानले जाते. तर दिर्घकाळ असणाऱ्या व्यक्तीला सुतक संपल्यानंतर या गोष्टीची काळजी घेतल्यास आराम मिळतो. ग्रहण संपल्यानंतर पिण्याचे पाणी बदलणे. सुतक संपल्यानंतर देवांना अंघोळ घालून पूजा केली जाते. तसेच चंद्र देवतेची पूजा केल्याने ही लाभ होतो. जर चंद्रकोर ही कमकूवत स्थितीमध्ये असेल तर 'ॐ चंद्राय: नम:' या मंत्राचा जाप केल्याने लाभ होतो. चंद्रग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे. तर भुकेल्याला आणि ब्राम्हणांना जेवण देऊ करावे.
गर्भवती महिलांनी खास करुन काळजी घ्या
हिंदू परंपरेनुसार, ग्रहणात गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यावेळी महिलांनी चांगले विचार मनात आणावे. ग्रहणामधील वातावरणातील नकारात्मक ऊर्जा गर्भवती महिलेच्या बाळासाठी धोकादायक ठरु शकते.तसेच गर्भवती महिलांनी ग्रहणात शिलाई काम, भाज्या कापणे किंवी भाज्या निवडणे वर्ज मानले जाते. त्यामुळे पोटातील बाळाच्या प्रकृतीवर परिणाम होतो असे मानले जाते.