World Sparrow Day: जागतिक चिमणी दिनानिमित्त जाणून घ्या या पक्ष्यांच्या संवर्धनासंबंधी महत्त्वाची माहिती
Sparrow (Photo Credits: Wikimedia Commons)

'या चिमण्यांनो परत फिरा रे' या गाण्याच्या ओळी आजही कानावर पडल्या तरी मन तृप्त होते. मात्र या चिमण्या परत आपल्या घराकडे फिरण्यासाठी या विश्वात चिमण्या राहिल्यात तरी कुठे? माणसाच्या वाढत्या गरजा आणि बदलेली लाईफस्टाईल यामुळे माणसाने स्वत: च्या निव-याची सोय करुन घेतली मात्र चिमण्यांचा निवारा मात्र काढून घेतला. त्यामुळे चिमणी वाचवा या मोहिमेसाठी हा दिवस 'जागतिक चिमणी दिन' (World Sparrow Day) साजरा केला जातो. त्यामुळे या दिनानिमित्त चिमण्या वाचविण्यासाठी काय करता याचा विचार करणे गरजेचे आहे.

चिमण्यांचा सकाळचा चिवचिवाट कानावर पडला तर मन प्रसन्न होते. लोकांची पहाट खूप सुंदर व्हायची. मात्र त्या चिमण्या आज माणसाच्या चुकीमुळे केवळ गाण्यामध्येच अस्तित्वात राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

चिमण्यांचे संवर्धन कसे कराल?

1. घरामध्ये खिडकीजवळ एका वाटीत थोडं धान्य आणि पाणी ठेवावे. ज्यामुळे तहानलेल्या आणि भुकेलेल्या चिमण्या त्याचा फायदा होईल.हेदेखील वाचा- World Sleep Day 2021: 'वर्ल्ड स्लीप डे' का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

2. शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये खाद्य भरून त्यांना फिडर म्हणून ठेवू शकता.

3. घरात काही बूट, चप्पल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे बॉक्स असतील तर त्यात चिमण्या आत जातील असे भोक पाडून त्याला घराच्या खिडकीवर उंच जागेवर टांगावे.

4. घराजवळच्या मोकळ्या जागेवर, सोसायटीत छोट्या झुडूपांची लागवड करा.

5. चिमण्यांसाठी बाभूळ वृक्षाची लागवड करा. कारण यावर चिमण्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.

6. घराच्या टेरेस, बाल्कनी, मोकळ्या जागेत बर्ड फिडर लावा.

या गोष्टींनी तुम्ही चिमण्यांचे संवर्धन करु शकाल. तुमच्या मुलांना आणि येणा-या पिढीला चिमण्यांची ओळख ही केवळ गाणी, कविता, गोष्टीपुरता न राहता त्यांचे अस्तित्व टिकून ठेवल्यास त्यांची प्रत्यक्षात खरी ओळख होईल.