
Laxmi Puja 2019: प्राचीन काळातील यक्षरात्री, दीपमाला, दीपप्रतिपदुत्सव आणि आताची दिवाळी.. या सणाचा आनंद लक्ष्मीपूजनाच्या (Lakshmi Pujan) म्हणजे दिवाळीच्या मूळ दिवशी द्विगुणित होतो. लक्ष्मीची यथासांग पूजा करुन, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्ताश्यांचा नैवेद्य दाखवून आश्विन महिन्यातील अमावस्येस लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. असे म्हणतात अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते, अशी आख्यायिका आहे.
या पवित्र सणाच्या तुमच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांना HD Images च्या माध्यमातून मराठमोळ्या शुभेच्छा देऊन यंदाची दिवाळी करा खास



हेदेखील वाचा- Laxmi Pujan Diwali 2019 Date: यंदा दिवाळसणात लक्ष्मीपूजन कधी आणि कोणत्या मुहूर्तावर करावे? जाणून घ्या पूजा विधी महत्त्व


लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाबरोबरच स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणारी नवी केरसुणी विकत घेऊन तिला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मीपूजनासारखा मांगल्याचा दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासोबत त्याला आधुनिकतेची जोड देऊन या HD Images च्या माध्यमातून तुम्ही यंदाची दिवाळी खास करु शकता.