Kumbh Mela 2019: सर्वात मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियान यासाठी कुंभमेळ्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद
Kumbh Mela 2019 in Guinness World Records (Photo Credit: Twitter)

Kumbh Mela 2019: प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दर चार वर्षांनी होत असलेला कुंभमेळा (Kumbh Mela 2019) देशातच नाहीत परदेशातही आकर्षणाचे केंद्र ठरतो. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी करोडोंच्या संख्येने भक्त उपस्थित राहतात. प्रयागराज येथे तब्बल 50 दिवस सुरु असलेल्या या कुंभमेळ्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' (Guinness World Records) मध्ये करण्यात आली आहे.

कुंभमेळ्या निमित्त प्रयागराज येथे मोठ्या संख्येने जमलेली लोक, त्यांची व्यस्वस्था आणि स्वच्छता अभियान तसंच सार्वजनिक स्थळांवरील पेंटिंग कार्यक्रम यामुळे कुंभमेळ्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये झाली आहे. सांस्कृतिक मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी तीन सदस्यीय टीमने कुंभमेळ्याचा दौरा केला. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान आयोजित केलेल्या पेंटिंग कार्यक्रमात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. दहा हजार लोकांनी गंगा थीमवर पेंटिंग केले. या पेंटिंगची खासियत म्हणजे यात कोणत्याही प्रकारच्या ब्रशचा वापर करण्यात आलेला नाही. सर्व पेंटिंग्स हाताने केलेल्या आहेत. या अनोख्या कार्यक्रमाची नोंदही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली." Kumbh Mela 2019 : पहा उपग्रहातून कसा दिसतो कुंभमेळा; ISRO ने काढला सॅटेलाईटद्वारे फोटो

1 मार्चला सुमारे 12000 सफाई कामगारांनी कुंभमेळ्यात सफाई केली. सफाई कामात इतक्या मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या लोक हे देखील कुंभमेळ्याचे आकर्षण ठरले. यंदाच्या कुंभमेळ्यात Engineers ते Management Graduates तब्बल 10 हजार लोकांनी स्विकारली नागा साधूंची दीक्षा

कुंभमेळ्याची सुरुवात 14 जानेवारीला झाली असून आज महाशिवरात्रीच्या मुहुर्तावर कुंभमेळ्यातील सहावे आणि शेवटचे शाही स्नान होणार आहे. गेल्या शाही स्नानात तब्बल 22 कोटी भक्तांनी सहभाग घेतला होता.