Kojagiri Purnima 2024 Rangoli Design: शरद पौर्णिमा, ज्याला ‘कोजागरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या रात्री धनाची देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. जो व्यक्ती या रात्री जागरुक राहून लक्ष्मीची पूजा करतो, त्याला लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी लक्ष्मीसोबत चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. असेही मानले जाते की, या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. कोजागिरी पौर्णिमेच्या खास प्रसंगी घर स्वच्छ केले जाते, दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते, दरम्यान, कोजागिरी पौर्णिमेच्या खास प्रसंगी काढता येतील अशा हटके रांगोळी डिझाईन आम्ही घेऊन आलो आहोत, खाली दिलेले व्हिडीओ पशून तुम्ही दारासमोर छान रांगोळी काढू शकता.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त काढता येतील असा हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा
वैज्ञानिक मतांनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात काही घटक असतात, जे आपले शरीर आणि मन शुद्ध करतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. असे मानले जाते की, शरद पौर्णिमेच्या चंद्राची किरणे अमृताने भरलेली असतात. त्यामुळे केशराची खीर तयार करून ती शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवल्यास चंद्राच्या किरणांतून अमृतसारखे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. त्यामुळे या रात्री जाळीदार कपड्याने खीर झाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर ती खीर देवी लक्ष्मीला अर्पण करून कुटुंबात वाटली जाते.