Mata Lakshmi, Lord Ganesha (PC - pixabay)

Dhanteras 2022: दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. आनंद, समृद्धी आणि संपत्ती देणार्‍या या सणात माता लक्ष्मीसोबत (Mata Lakshmi) गणेशाची (Lord Ganesha) पूजा केली जाते. या दिवशी गणेश आणि माता लक्ष्मीच्या नवीन मातीच्या मूर्ती स्थापित केल्या जातात, त्या वर्षभर ठेवल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची ही मूर्ती खरेदी करणे शुभ मानले जाते. तुम्हीही गणेशजी आणि माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणार असाल तर या गोष्टींची जरूर काळजी घ्या, जेणेकरून पूजेचे पूर्ण फळ मिळू शकेल.

लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा - 

  • माता लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.
  • लक्ष्मी-गणेशजींची मूर्ती केवळ बसलेल्या स्थितीत असणे गरजेचे आहे. उभ्या स्थितीतील मूर्ती कधीही खरेदी करू नका.
  • मूर्ती खरेदी करताना गणेशाची सोंड डावीकडे वळलेली आहे का? हे लक्षात ठेवा. अशा मूर्तीची पूजा केल्याने तो लवकर प्रसन्न होतो. यासोबतच सोंडेमध्ये दोन वळणे नसावीत हेही लक्षात ठेवावे.
  • तसेच माता लक्ष्मीची मूर्ती विकत घेताना ती कमळात विराजमान झालेली असावी आणि तिचे हात वराच्या मुद्रेत पैशाचा वर्षाव करत असणारे हवेत.
  • गणपतीची मूर्ती खरेदी करताना उंदीराचे लक्ष ठेवा. गणेशाच्या मूर्तीत उंदीर नसेल तर ती मूर्ती खरेदी करू नका. उंदरावर स्वार असलेल्या गणेशाची मूर्ती देखील शुभ मानली जाते.
  • गणपती आणि लक्ष्मीजींची अशी मूर्ती अजिबात खरेदी करू नका, ज्यामध्ये दोन्ही एकच जोडलेले असतील. नेहमी वेगवेगळी मूर्ती खरेदी करा.

तथापी, लक्ष्मीची घुबडावर बसलेली मूर्ती कधीही विकत घेऊ नका. अशा मूर्तीला अलक्ष्मी किंवा काली लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यासोबतच लक्ष्मीची मूर्ती उभ्या राहून खरेदी करू नका.

लक्ष्मी गणेशाची मूर्ती या दिशेला ठेवा -

पूजा करताना गणपती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती घराच्या पूर्व दिशेला किंवा घराच्या मध्यभागी ठेवावी आणि नंतर विधिवत पूजा करावी.

डिसक्लेमर -

या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/साहित्य/गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे हा आहे, वापरकर्त्यांनी ती केवळ माहिती म्हणून घ्यावी. याव्यतिरिक्त, वापरकर्ता स्वत: त्याच्या कोणत्याही वापरासाठी जबाबदार असेल.