कार्तिकी शुद्ध एकादशी (Kartiki Ekadashi 2020) किंवा प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी यंदा 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी, तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढ शुद्ध एकादशीस 'देवशयनी एकादशी' म्हटले आहे, त्या दिवशी देव झोपी जातात. तसेच कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून हिंदू धर्मीयांमध्ये या दोन्ही एकादशींचे अनन्यसाधारण महत्व आहे. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिकी एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते, असे सांगितले जाते. तर असा हा व्रताचा, भजन-कीर्तनाचा, विठ्ठलाची महापूजा करण्याचा दिवस खास तुकोबांचे अभंग, विठ्ठलाचे भजन ऐकून व्यतीत करा. (हेही वाचा: कार्तिकी एकादशी निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp Stickers शेअर करुन मंगलमय करा दिवस!)
यंदा कार्तिकी एकादशी 24 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री, 2.43 सुरु होत असून, 25 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस एकादशी असेल. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.10 वाजता एकादशी संपेल. दरवर्षी कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र यंदा यावर कोरोनाचे सावट असणर आहे. त्यामुळे तुम्हीही मंदिरात पूजा-अर्चना करताना कोरोना नियमांचे पालन करा.