
Kartiki Ekadashi Marathi Wishes: वारकरी सांप्रदायासाठी आनंदाचा सोहळा घेऊन येणारा सण म्हणजे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi). यंदा कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच 8 नोव्हेंबर रोजी हा उत्सव पंढरपुरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील भाविक मंडळी पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आवर्जून भेट देतात. या दिवसाचे वैशिष्ट्य असे की चार महिन्यांआधी देवशयनी (आषाढी) एकादशीच्या (Aashadhi Ekadashi) मुहूर्तावर देव निजतात आणि कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पुन्हा जागे होतात अशी मान्यता आहे. म्ह्णूनच कार्तिकी एकादशीला देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi) असेही म्हंटले जाते. या दोन्ही दिवशी पंढरपुरात मोठा सोहळा रंगतो. काही कारणाने जर का तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य नसेल तर या दिवसाच्या निदान शुभेच्छा देऊनही तुम्ही घरबसल्या आनंद साजरा करू शकता.कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा देणारे हे काही मराठी संदेश, Images, Messages, तुम्ही WhatsApp Status, Facebook आणि अन्य सोशल मीडियावरून शेअर करू शकता.
या दिवशी विठ्ठल भक्तांसोबत तुम्ही हे शुभेच्छापत्र शेअर करून त्यांचाही आनंद द्विगुणित करायला विसरू नका. चला तर पाहुयात कार्तिकी एकादशी निमित्त शुभेच्छा देणारे ही काही फ्री टू डाउनलोड शुभेच्छापत्रे..
पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना,
हिच प्रार्थना पांडुरंगाला
कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या जीवीचे जीवन
माझ्या विठ्ठलाचे निधान
उभा असा विटेवरी
वाटे प्रेमाची शिदोरी
कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा

|| टाळ वाजे, मृदंग वाजे,वाजे हरीची वीणा ||
||माऊली निघाले पंढरपूरा..,मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ||
कार्तिकी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भक्तीच्या वाटेत गाव तुझे लागले
आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले
तुझा प्रेमाचा झरा असाच कायम वाहू दे
माझ्या माणसांना असेच सुखात राहू दे
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
कार्तिकी एकादशी निमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
मनःपूर्वक शुभेच्छा

हिंदू परंपरेनुसार देव उठनी ही एकादशी सर्वात मोठी आणि फलदायी मानली जाते. या दिवसापासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. रुढीनुसार,या एकादशीचे व्रत केल्यास सर्व भक्तांचे पाप नष्ट होऊन स्वर्ग प्राप्ती होणार असल्याचे समजले जाते.