
महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी कर्नाटकी बेंदूर (Karnataki Bendur) साजरा करण्याची पद्धत आहे. आज वटपौर्णिमा साजरी केल्यानंतर उद्या (25 जून) दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेच्या भागावर असणारे अनेक शेतकरी बेंदूर सण साजरा करतात. प्रामुख्याने महाराष्ट्रात कर्नाटकी बेंदूर हा कोल्हापूर (Kolhapur) प्रांतामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. शेतकरी कुटुंबासाठी त्यांचा बैल हा सवंगडी असतो. शेतीच्या कामातून त्याला एक दिवसाचा आराम देत त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा कर्नाटकी बेंदूर. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने आपल्या बळीराजाप्रमाणेच त्याच्यासोबतीने शेतामध्ये राबणार्या बैलाप्रती देखील आदर भाव अर्पण करण्याचा हा दिवस असल्याने आज तुम्ही थेट बैलजोडीची पूजा करू शकत नसलात तरीही सोशल मीडीयात या कर्नाटकी बेंदूरच्या शुभेच्छा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. तुम्हांला कर्नाटकी बेंदूरच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, मेसेजेस, Wishes, Greetings, HD Images डाऊनलोड करून ती शेअर करण्यासाठी टीम लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही खालील मराठमोळी शुभेच्छापत्र नक्कीच वापरू शकता. Karnataki Bendur 2021 HD Images: कर्नाटकी बेंदूर सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी एचडी इमेज, WhatsApp Status, Wishes, Facebook Messages इथून करु शकता डाऊनलोड.
कर्नाटकी बेंदुरला घरातील गाय, बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं. शिंगांना रंग लावत, अंगावर झूल टाकून पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे. यासोबतच काही घरांत मातीचे बैल आणून त्यांची पुजा केली जाते. या दिवशी बैलांना हरभर्याची डाळ आणि गूळ मिश्रित कडबोळे बनवूनते त्यांच्या शिंगावर ठेवून त्याची पूजा देखील केली जाते.
कर्नाटकी बेंदूर सणाच्या शुभेच्छा

कर्नाटकी बेंदूरच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

बैल घामाची प्रतिमा
बैल श्रमाचं प्रतिक
बैल माझ्या शिवारात
काढी हिरवे स्वस्तिक
कर्नाटकी बेंदुरच्या हार्दिक शुभेच्छा

सण आनंदाचा
सण बळीराजाचा
कर्नाटकी बेंदुरच्या हार्दिक शुभेच्छा

कर्नाटकी बेंदुरच्या हार्दिक शुभेच्छा

कर्नाटकी बेंदूर प्रमाणेच महाराष्ट्रात आता येत्या काही महिन्यात महाराष्ट्रीय बेंदूर, बैल पोळा हे सण देखील साजरे केले जाणार आहे. पावसाळा जसा पुढे सरतो तशी आता सणांची रेलचेल सुरू होणार आहे. पण हे सण जसे आपल्याला आनंद देतात तसेच निसर्गातील अनेक लहान मोठ्या गोष्टींबद्दल, पंचतत्त्वांबद्दल आपला आदर वक्त करायला देखील भाग पाडतात. मग यंदाच्या वर्षी घरातील पशूधनाला जपत, वृद्धिंगत करत या कर्नाटकी बेंदुर सणाची मज्जा लुटायला सुरूवात करा.