कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo Credits-File Images)

Kanya Pujan HD Images 2020: नवरात्रौत्सवाचा सण सध्या सर्वत्र साजरा केला जात आहे. तर आज (24 ऑक्टोंबर) नवरात्रौत्सवाचा आठवा दिवस म्हणजेच अष्टमी आहे. या दिवशी करण्यात येणाऱ्या कन्या पूजनाला फार महत्व आहे. कारण कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुली देवीच्या रुपात येतात असे मानत त्यांची पूजा केली जाते. चैत्र महिना असो किंवा शारदीय नवरात्र, देवी मातेची कृपावृष्टी आपल्यावर कायम रहावी यासाठी 9 दिवसांचे व्रत ठेवले जाते. असे मानले जाते की हे 9 दिवसांचे व्रत कन्या पूजनाने संपन्न होते. यासाठीच लहान मुलींचा दुर्गेचे प्रतीक मानत त्यांची पूजा केली जाते. यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते असे परंपरेनुसार बोलले जात आहे.(Kanya Pujan 2020 Shubh Muhurat: नवरात्रोत्सवात यंदा कधी कराल कन्या पूजन? जाणून घ्या महत्त्व आणि विधी)

कन्या पूजन हे सप्तमी नंतर येणाऱ्या अष्टमीच्या दिवशी केली जाते. तर कन्या पूजनाच्या दिवशी लहान मुलींसह एका लहान मुलाला ही घरी बोलावून त्यांचे पाय दूधाने किंवा पाण्याने स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना एका स्वच्छ ठिकाणी बसवून डोक्यावर अक्षता, फूल आणि कुंकु लावत त्यांची पूजा केली जाते. तसेच खीर-पुरीचा प्रसाद ही दिला जातो. शेवटी मुलींना रुमाल, लाल रंगाची ओढणी, फळ किंवा काही वस्तू देत त्यांच्या पायाला नमस्कार करुन ही कन्या पूजनाची विधी पूर्ण केली जाते. तर यंदाच्या कन्या पूजनानिमित्त Messages, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन देवीच्या रुपातील चिमुकलींचा करा सन्मान!(Dussehra 2020 Date: यंदा दसरा कधी साजरा होणार? जाणून घ्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या सणाचे महत्त्व)

कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo Credits-File Images)
कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo Credits-File Images)
कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo Credits-File Images)
कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo Credits-File Images)
कन्या पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Photo Credits-File Images)

दुर्गाष्टमी पूजनाचे फार महत्व आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात अष्टमी आणि नवमीच्या दिवशी लहान मुलींची पूजा केली जातेच. त्याचसोबत महागौरी आणि सिद्धिदात्री देवीची ही पूजा करण्यात आल्यानंतर हवन सुद्धा करतात. बहुतांश लोक अष्टमी आणि नवमीच्या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा करतात.