Jara Jivantika Pujan 2020 Messages: श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे. श्रावणात सोमवाराला जितके महत्त्व आहे, तितकचं महत्त्व श्रावणी शुक्रवारादेखील आहे. श्रावण महिन्यात शुक्रवारी 'जरा जिवंतिका देवी'ची पूजा केली जाते. जरा म्हणजे 'म्हातारपण' आणि जिवंतिका म्हणजे 'जिवंत ठेवणारी'. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणारी देवी म्हणून जरा जिवंतिका देवीची श्रावणात पूजा केली जाते. तसेच आपल्या अपत्याला म्हणजेच आपल्या बाळाला भरपूर आयुष्य मिळावे, यासाठीही या देवीची मनोभावे पूजन केले जाते.
श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची अराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन सत्कार केला जातो. या विधीस 'सवाष्ण करणे' म्हणतात. श्रावण महीन्यात चारी शुक्रवारी संध्याकाळी सुवासिनींना हळदी- कुंकवाला बोलवून त्यांना दुध्-साखर चणे-फुटाणे देण्याची प्रथा आहे. तसेच शुक्रवारी पुरणपोळीचे गोड जेवण करून सवाष्ण जेवावयास घातली जातात. यंदा श्रावण महिन्यात 'जरा जिवंतिका देवी' पूजन निमित्त मराठी संदेश, Wishes, Whatsapp Status वर शेअर करून सुवासिनींना शुभेच्छा देण्यासाठी खालील फोटोज तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Shravan 2020 Messages: श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळे Wishes, Whatsapp Status, HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करुन साजरा करा श्रावण मासारंभ!)
जरा जिवंतिका पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा !
जरा जिवंतिका पूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
जरा जिवंतिका पूजनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा !
जरा जिवंतिका पूजनाच्या सर्व सुवासिनींना शुभेच्छा !
श्रावण महिन्यातील जरा जिवंतिका पूजनाच्या सर्व सुवासिनींना शुभेच्छा !
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संततीरक्षणार्थ मानली जाते. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची आणि लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा केली जाते. जरा जिवंतिका देवी ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. शुक्रवारी दुर्वो, फुले, आघाड्याची माळ करून ती जिवतीला घातली जाते. महाराष्ट्रात जिवंतिका पुजेचे व्रत मोठ्या भक्तीभावाने केले जाते.