Shravan 2020 Messages (PC - File Image)

Shravan 2020 Messages in Marathi: श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव पडले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा 23 जुलै ते 22 ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो. श्रावण महिन्यालाचं हिंदीत 'सावन' असं म्हटलं जातं.

श्रावण महिना हा चैतन्यमय आणि मंगलमय असतो. या पवित्र महिन्याच्या आपल्या मित्र परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून HD Images, Quotes, Greetings, Messages शेअर करण्यासाठी खालील मराठमोळी शुभेच्छापत्र तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Shravan Somvar 2020 Date: शिवभक्तांसाठी खास असलेले श्रावणी सोमवार यंदा कधी? पहा, कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ?)

जरासा लाजरा

सुंदर साजरा,

ऊन पावसाचा खेळ सुरू झाला,

पवित्र श्रावण आला,

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan 2020 Messages (PC - File Image)

यक्षप्रश्न मनी आला

का बरे निसर्ग गाऊ लागला

संगती झाडे वेली

अरे खुल्या मना रे

हा बघ श्रावण आला

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan 2020 Messages (PC - File Image)

रंग रंगात रंगला श्रावण

नभ नभात उतरला श्रावण

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan 2020 Messages (PC - File Image)

हासरा नाचरा जरासा लाजरा,

सुंदर साजिरा श्रावण आला

पवित्र श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Shravan 2020 Messages (PC - File Image)

श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सर सर शिरवे

क्षणात फिरूनी ऊन पडे

श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Shravan 2020 Messages (PC - File Image)

श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीचं कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना. धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' प्रसिद्ध आहे.