Jara Jivantika Puja 2020: जरा जीवंतिका पूजा करण्यामागची 'ही' आहे कथा; जाणून घ्या पूजा विधी आणि तारीख
Jara Jivantika (Photo Credits: File)

Jara Jivantika Puja Vidhi and Date: श्रावण म्हटला की महाराष्ट्रात सणासुदीची जणू रीघच लागते. श्रावणात येणा-या प्रत्येक सणांसाठी महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो. श्रावणात (Shravan) श्रावणी सोमवाराइतकेच श्रावणी शुक्रवार महत्त्वाचा असतो. या शुक्रवारी जरा जीवंतिका (Jara Jivantika) देवीची पूजा केली जाते. यंदा ही पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी म्हणजेच 24 जुलै, 31 जुलै, 7 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट करायची आहे. श्रावणातील दर शुक्रवारी या देवीची पूजा करण्यामागे कारणही तितकेच खास. ते म्हणजे संततीप्राप्तीसाठी ही पूजा लाभदायक असते असे पुराणातील कथेच सांगितले आहे.

ही कथा नेमकी काय आहे आणि जरा जीवंतिका देवीची पूजा विधी कशी कारावी याविषयी थोडी माहिती करून घेऊयात. Mangalagaur 2020 Mehendi Designs: मंगळागौरीचा उत्सव घरच्या घरी छान साग्रसंगीत करण्यासाठी हातावर काढण्यासाठी मेहंदीच्या अगदी सोप्या आणि सुरेख डिझाईन्स

या दिवसाचे विशेष महत्व:

जरा जिवंतिका देवी ही बालकांची रक्षण करणारी देवी आहे. पुराणात असे सांगितले आहे की, जरा ही मूळची राक्षसीण होती. ती मगध देशांत वास्तव्यास होती. मगध मधील नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. त्यामुळे त्याला जन्मताच नगराबाहेर फेकून देण्यात आले. यावेळी जरा राक्षसीने त्या बाळाच्या शरीराचे जे दोन भाग झाले होते ते जुळवले आणि त्याला जीवदान दिले. तो बालक 'जरासंध' म्हणून ओळखले जाऊ लागले. मग पुढे जाऊन मगध देशात जरा राक्षसीनेचा मोठा उत्सव साजरा केला जाऊ लागला. तेथील लोक तिला सर्व मुलांची आई समजू लागली. आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तिची पूजा करु लागले.

जरा जीवंतिका देवीची पूजा विधी:

महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.

आपल्या बाळाचे रक्षण व्हावे यासाठी हिंदू स्त्रिया जरा जिवंतिकेची मनोभावे पूजा करतात. या देवीचे पूजा केल्याने जरा जिवंतिका देवी आपल्या बाळावर प्रसन्न होऊन त्याचे रक्षण करेल, अशी महिलांची श्रद्धा आहे.