Mangalagaur Mehendi Designs (Photo Credits: Instagram)

Easy Mangalagaur Mehendi Designs: लग्नानंतर नवविवाहित महिलेने पहिली 5 वर्ष आपल्या सासरी मंगळागौरीचे व्रत करणे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रथा आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात. लाट्या बाई लाट्या, नाच ग घुमा, खुर्ची की मिरची सारखे खेळ, फुगड्या घातल्या जातात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे या आनंदावर विरजण पडणार असून असे खेळ एकत्र येऊन खेळता येणार नाही. मात्र घरी राहून आपण आपल्या परीने या सणाचा आनंद लुटू शकता. हातावर छान मेहंदी काढून, साजशृंगार करून मंगळागौरीचा (Mangalagaur) हा सण साजरा केला जाऊ शकतो.

जर तुमच्या फारसा वेळ नसेल तर अगदी छोटीशी मेहंदीही (Mehendi) तुम्ही हातावर काढू शकता. यासाठी तुम्ही सोप्या मेंहदीच्या डिझाईन्स शोधत असाल तर तुम्हाला पुढे दिलेल्या डिझाईन्सची फार मदत होईल.

हेदेखील वाचा- Mangalagaur 2020 Date: नवविवाहितांसाठी आनंदाची पर्वणी असणारी मंगळागौर यंदा कधी साजरी कराल? जाणून घ्या पूजेचे महत्त्व आणि विधी

 

View this post on Instagram

 

❤️ @_mehendi_and_food_official_ . #mehendi

A post shared by Mehendi❤️ART AND FOOD LOVER (@_mehendi_and_food_official_) on

कशा वाटल्या मेहंदी डिझाईन्स? लॉकडाऊन असो वा काहीही तुम्ही घरच्या घरी अगदी साधेपणाने मंगळागौरीचा हा सण साजरा करा आणि मनसोक्त आनंद लुटा.