Satyanarayan Puja Invitation Card In Marathi (फोटो सौजन्य - File Image)
Satyanarayan Puja Invitation Card In Marathi: माघ पौर्णिमेला उपवास करण्याची आणि घरी भगवान सत्यनारायणाची पूजा (Satyanarayan Puja) करण्याची आणि त्यांची कथा सांगण्याची परंपरा आहे. प्रयागराजमधील माघ मेळा माघ पौर्णिमेच्या (Magh Purnima 2025) दिवशी संपतो. यंदा 11 फेब्रुवारी, संध्याकाळी 06:56 वाजता माघ पौर्णिमा सुरू होते. तसेच 12 फेब्रुवारी, संध्याकाळी 07:22 वाजता संपते. या दिवशी अनेक जण आपल्या घरी सत्यनारायणाची महापूजा (Satyanarayan Maha Puja) आयोजित करतात.
तुम्ही देखील तुमच्या घरी सत्यनारायणाची पूजा करण्याचे ठरवले असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मराठी सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका (Satyanarayan Puja Invitation Card) घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे Messages, Images शेअर करून तुमच्या मित्र-परिवाला तसेच आप्तेष्टांना महापूजेसाठी आग्रहाचे निमंत्रण देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Magh Purnima 2025 Date: माघ महिन्यातील पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या पूजाविधी, धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व)
सत्यनारायण पूजा निमंत्रण पत्रिका -
!! श्री गणेशाय नम:!!श्री स्वामी समर्थ कृपा !!
🏡 श्री सत्यनारायण महापूजा 🏡
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, आमच्या येथे
श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती...
तारीख -
स्थळ -
वेळ -
Satyanarayan Puja Invitation Card In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)
!! श्री गणेशाय नम:!!
🏡 श्री सत्यनारायण महापूजा 🏡
आग्रहाचे निमंत्रण!!
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, आमच्या येथे
श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसह तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती...
तारीख -
स्थळ -
वेळ -
Satyanarayan Puja Invitation Card In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)
!! श्री गणेशाय नम:!!
सत्यनारायण पूजा आमंत्रण
॥श्री सत्यनारायण प्रसन्न॥
आमच्या येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती...
तारीख -
स्थळ -
वेळ -
Satyanarayan Puja Invitation Card In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)
!! श्री गणेशाय नम:!!
🏡 श्री सत्यनारायण महापूजा 🏡
आग्रहाचे निमंत्रण!!
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, आमच्या येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित कारण्यायत आली आहे, तरी आपण सहपरिवार सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा
ही विनंती...
तारीख -
स्थळ -
वेळ -
Satyanarayan Puja Invitation Card In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)
!! श्री गणेशाय नम:!!
🏡 श्री सत्यनारायण महापूजा 🏡
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, सालाबादाप्रमाणे यावर्षीही आमच्या घरी श्री सत्यनारायणाची पुजा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सहपरिवार सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती...
तारीख -
स्थळ -
वेळ -
Satyanarayan Puja Invitation Card In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)
माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. माघ स्नान पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमेच्या दरम्यान केले जाते. माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व तलाव, तीर्थक्षेत्रे आणि नद्यांमध्ये शुद्ध स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला अनेक तीर्थस्थळांच्या काठावर मेळे भरतात. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले गेले आहे.