
2015 पासून दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस (International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा या योगा डे सेलिब्रेशनचं 8वं वर्ष आहे. या वर्षी जागतिक योगा डे “Yoga For Humanity” या थीमवर साजरा केला जाणार आहे. अनेक आजारांवर मात करण्यासाठी शरीराची, मनाची तयारी करण्यासाठी, अनेक व्याधींना शरीरापासून दूर ठेवण्याकरिता रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग साधना मदत करते. म्हणूनच भारतामध्ये आयुर्वेदात उगमस्थान असलेल्या योगा अभ्यासाला आज जगात लोकप्रियता मिळत आहे. मग यंदाच्या योगदिनाच्या शुभेच्छा देखील तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना देऊन या दिवसाचं महत्त्व वाढवा. सोशल मीडीयात WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शुभेच्छा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता.
2022 चा जागतिक योगा दिवसाचा भारतामधील मुख्य सोहळा कर्नाटकातील म्हैसूर पॅलेस मध्ये होणार आहे. कोरोना संकटानंतर यंदा भारताचे पंतप्रधान दोन वर्षांनी सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. जगभरात योग दिना निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.
जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा





योगा अभ्यास नियमित करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हा केवळ एक दिवस सेलिब्रेशनचा भाग नाही. धकाधकीच्या जीवनात निरामय आरोग्यासाठी, समाधानी आयुष्यासाठी स्वतःची मानसिक आणि शारिरीक तयारी ठेवण्यासाठी तुम्हांला योगाभ्यास नक्कीच मदत करू शकते.