International Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)

उद्या 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन. जगभरात साजऱ्या होणाऱ्या योगदिनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे.

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली|
International Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)
World's shortest woman, Jyoti Amge, practices Yoga (Photo Credits: ANI/Twitter)

उद्या 21 जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day). जगभरात साजऱ्या होणाऱ्या योगदिनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि योगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी योग दिन अगदी उत्साहात साजरा केला जातो. यात विविध संघटना, संस्था सहभागी होतात. जगभरातून योग दिनाला भरभरुन प्रतिसाद मिळतो. (योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम)

योग दिनाच्या उत्साहात जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे (Jyoti Amge) हिने देखील सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी करताना ज्योती अमगे हिने नागपूरात योगसनांचा सराव केला. योगसाधना करतानाचे तिचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आला आहे.

ANI ट्विट:

ज्योती अमगे हिने अमेरिकन आणि इटालियन टीव्ही सिरीजमध्ये अभिनय केला असून ती बिग बॉस 6 मध्येही झळकली होती. लोणावळ्याच्या सेलिब्रेटी वॅक्स म्युझियममध्ये तिचा पुतळा देखील आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel