International Tea Day: तुम्ही चहाप्रेमी असाल तर नक्की जाणून घ्या चहाचे हे काही फायदा
Tea (PC -You Tube)

International Tea Day: चहा प्रेमींसाठी आज खास दिवस आहे कारण आज म्हणजेच 15 डिसेंबर रोजी जागतिक चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. जवळपास प्रत्येकाच्याच दिवसाची सुरुवात चहाने होते. तर आजच्या या खास दिवशी जाणून घेऊया चहाचे काही असे फायदे जे तुम्हाला करतील थक्क.

केसांची चमक वाढवण्यासाठी

केस चमकदार व्हावेत यासाठी ग्रीन टी चा वापर केला जातो. त्यासाठी ग्रीन टीच्या तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्याव्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. केस गडद होण्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.

डोळ्यांवरील सूज घालवण्यासाठी

सुजलेले डोळे टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. त्यासाठी डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर 10 मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.

आपल्यासोबत गुलाबाच्या फुलांचं सौंदर्य वाढवण्यासाठी

चहाच्या पानांमध्ये असलेलं विशिष्ट प्रकारचे टॅनिक ऍसिड गुलाबाच्या फुलांचे सौंदर्य आणि रंग वाढवण्यास मदत करतं. त्यासाठी वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी.

Festival Calendar 2020: मकरसंक्रांत, गणेश चतुर्थी, दिवाळी हे सण नव्या वर्षात पहा कधी येणार?

पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी

जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंध येत असेल किंवा पायाच्या स्किनची समस्या असेल तर टी बॅगचा वापर करू शकता. त्यासाठी कोमट पाण्यात टी बॅग टाकून त्या पाण्यात पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, पण त्याचसोबत पायदेखील मऊ होतात.