Happy Mother's Day Gifts: मे महिन्यतील दुसरा रविवार हा मदर्स डे ( International Mothers Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा 12 मे दिवशी भारतासह जगभरात मदर्स डे (Mother's Day) साजरा केला जाणार आहे.आईच्या ऋणाची परतफेड कोणत्याच मुलाला करता येत नाही. पण किमान 'मदर्स डे'चं (Mother's Day) औचित्य साधून आज तिच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना तिला काही प्रॉमिसेस नक्की द्या. कारण कितीही महागड्या गिफ्ट्सपेक्षा आईला तिच्या मुलांच्या चेहर्यावरील समाधान आणि आनंद अधिक महत्त्वाचा असतो. म्हणूनच आज केवळ सरप्राईज गिफ्ट्सने नव्हे तर आईला या दिलासादायक प्रॉमिसेसनीदेखील खूष करू शकता. Mother's Day 2019 Wishes and Messages: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा मदर्स डे!
किमान एक वेळचं जेवण एकत्र
कामाच्या विचित्र वेळांमधुन नेहमीच कुटूंबासोबत राहणं शक्य नसतं. पण शक्य असेल तर नियमित किमान एक वेळचं जेवण घरातील सार्या व्यक्तींसोबत एकत्र करण्याचा प्रयत्न करा.
संवाद कायम ठेवाल
आजकाल शाळा, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असोत किंवा अगदी करियरच्या मागे धावणारी नोकरदार मंडळी सार्यांचं जीवन इतकं घडाळ्याच्या काट्यावर धावतंय की एकाच घरात राहूनदेखील आपल्याच कुटूंबातील व्यक्तींशी बोलायला आपल्याला वेळ नाही. आज मदर्स डेच्या निमित्ताने आईला एक असं प्रॉमिस द्य की कितीही कामात असाल तरीही दिवसातील काही वेळ तिच्याशी बोलण्यासाठी, एकमेकांच्या मनातलं शेअर करण्यासाठी राखून ठेवलेला असेल. Mother’s Day 2019 Gift Ideas: मदर्स डे निमित्त आईला सरप्राईज देण्यासाठी '5' बजेट फ्रेंडली आणि हटके गिफ्ट आयडियाज!
इंटरनेट,सोशल मीडियाचा मर्यादीत वापर कराल
इंटरनेट हे दुधारी शस्त्र आहे.त्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेदेखील आहे. व्हर्च्युअल जगताना आपण कधी त्याच्या आहारी जातो याचं भान राहत नाही. समोरासमोर बसूनही स्मार्टफोनमध्ये डोकं खूपसुन बसणं टाळा.
नैराश्यापासून लांब रहाल
अनेकदा आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख कुरवाळत बसताना अनेकजण नकळत नैराश्यात जातात आणि टोकचं पाऊल उचलतात. एका चूकीच्या निर्णयामुळे सार्या कुटूंबाची फरफट होते त्यामुळे नैराश्य आलं तरीही त्याचा सामना करायला शिका.
आईला गृहीत धरणं टाळा
हक्काच्या माणसांना आपण कळत नकळत गृहीत धरतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती म्हणजे आई असतेच. पण यंदाच्या मदर्स डे पासून तिला गृहीत धरणं बंद करा. एखाद्या गोष्टीवर, परिस्थितीवर तिची वैयक्तित आणि स्वतंत्र मत असू शकतात. तिच्याही मनाचा आदर ठेवत तिला स्वतंत्र निर्णय मुभा द्या. पुरूषप्रधान संस्कृतीमध्ये अनेकदा घरातल्या स्त्रीला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये दुय्यम स्थान दिलं जातं. यामुळे अनेकजणी वर्षानुवर्षे दडपणाखालीच जगत असतात.
यंदा मदर्स डे निमित्त थोडा वेगळा विचार करुन आईला काहीतरी हटके गिफ्ट द्या. आईवर प्रेमाचा वर्षाव करा आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट द्या.