
28 मे हा आंतरराष्ट्रीय हस्तमैथुन दिन (International Masturbation Day) म्हणून साजरा केला जातो. हस्तमैथुन (Masturbation) ही मानवांमध्ये घडणारी एक नैसर्गिक क्रिया आहे, ज्याचे महत्व आपण सर्वजण जाणतोच. 1994 मध्ये हस्तमैथुन विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग असल्याचे सुचवल्याबद्दल, सर्जन जनरल जॉइसलीन एल्डर यांना अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी कामावरून काढून टाकले होते. या घटनेनंतर 7 मे 1995 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय हस्तमैथुन दिन, सर्जन जनरल जॉइसलीन एल्डरच्या सन्मानार्थ साजरा करण्यात आला. हस्तमैथुनबाबत जागरूकता निर्माण करणे, याबाबत मोकळा संवाद सुरू करणे आणि या कृतीचा स्वीकार करणे, यासाठी या दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
स्वतःच्या शरीराला स्पर्श करून लैंगिक सुख मिळवण्याच्या क्रियांना हस्तमैथुन म्हणतात. बहुतेक जणांनी आपल्या आयुष्यात एकदा ना एकदा तरी ही क्रिया केली असेल. तर अशा या आंतरराष्ट्रीय हस्तमैथुन दिनाचे औचित्य साधून याबाबतच्या काही तथ्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
हस्तमैथुन हे निरोगी आहे, ही क्रिया आपला मूड सुधारते आणि मासिक पाळीदरम्यान Cramps कमी करण्यास मदत करू शकते
हस्तमैथुन केल्यामुळे एड्रेनालाईन, ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन रिलीज होते, जे तुमचा मूड सुधारण्यास आणि तुम्हाला तणावमुक्त ठेवण्यास मदत करते. मास्टरबेशन तुम्हाला चांगल्या झोपेमध्ये देखील मदत करू शकते, कारण यामुळे एंडोर्फिनस रिलीज होते व त्यामुळे रक्तदाब संतुलित होतो. परिणामी तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये जाता.
2016 च्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की नियमित हस्तमैथुन केल्यामुळे काही पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोकाही कमी होतो. यामुळे, महिलांमध्ये ऑर्गेज्म मासिक पाळीच्या दरम्यान त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.
हस्तमैथुन केल्याने एखादी व्यक्ती नपुंसक होत नाही
हस्तमैथुन केल्याने एखाद्या व्यक्तीमध्ये नपुंसकत्व उद्भवणार नाही किंवा ती अंधदेखील होणार नाही. त्याउलट, हस्तमैथुन केल्याने आपल्याला आनंद तर मिळतोच, मात्र त्यासोबत आपल्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन वाढविण्यास मदत मिळते.
निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते
हस्तमैथुन आपले नातेसंबंध सुधारण्यास किंवा ते योग्य प्रकारे टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. मास्टरबेशन आपल्यामध्ये शारीरिक आणि लैंगिकदृष्ट्या आत्मविश्वास वाढवतो. हस्तमैथुन ऑक्सिटोसिन, एंडोर्फिन आणि ऑक्सीकॉन्टीन सारखे हार्मोन्स रिलीज करते, जे तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणून नात्यामधील कडवेपणा दूर करू शकण्यास मदत करू शकते. यासोबत तुमच्या पार्टनरचा मूड सुधारण्यासही मदत करू शकतो. (हेही वाचा: Safe Masturbation Tips: हस्तमैथुन करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी अन्यथा होऊ शकते मोठी इजा)
दरम्यान, हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. उलट हस्तमैथून करणे ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. यामुळे ओटीपोटाचे स्नायू मजबू होतात, परिणामी लैंगिक संवेदनशीलता वाढण्यास मदत होऊ शकते. हस्तमैथुन करायला कोणतीच ठराविक मर्यादा नाही, ही गोष्ट व्यक्तीपरत्वे बदलते. त्यामुळे हस्तमैथुनाबाबत जे काही गैरसमज असतील ते मनातून काढून टाका, किंव्बा डॉक्टरांचा सल्ला घ्या व स्वतःला ‘आनंदी’ ठेवा.