International Joke Day: पोट धरून हसायला लावतील हे 5 भन्नाट जोक्स
Laughing Pic (Photo Credits: Flickr)

कामाच्या व्यापात आणि धावपळीच्या जगात सध्या माणूस हसणं विसरून गेलाय. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण उत्तम आरोग्याचा मूलमंत्र मनसोक्त हसणे हाच आहे. ज्यांच्या आयुष्यात हसू नसते ते लोक खूपच बोअरिंग आणि थोड्या विचित्र स्वभावाची असतात. हसणे हा सर्व आजारांवर रामबाण उपाय आहे. हसण्याने आपल्या वाट्याला आलेले कोणतेही संकटं आपण अगदी सहजपणे पार करु शकतो. ज्या माणसांना हसता येत नाही त्यांना हसण्यासाठी जोक्सचा आधार घ्यावा लागतो. जेणेकरुन माणूस अगदी खळखळून असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 'आंतरराष्ट्रीय जोक दिना' (International Joke Day) निमित्त तुम्हाला असे भन्नाट जोक्स सांगणार आहोत, जे ऐकून तुम्ही पोट धरून हसाल.

1. दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.

बाबा- "वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ!!"

मुलगा - "आईसक्रीम का बाबा..??

तुम्ही पण बियर घ्या ना.."

बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?

2. मी: hey dad wassup??

पप्पा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे ?

मी: ok ठीक आहे . मला जरा गरमकेंद्रबिंदु देता का ?

पप्पा: हे काय असत आता ?

मी: hotspot हो पप्पा

पप्पानी spot hot होइपर्यन्त धुतला

3. आई: बेटा तु केस का कापत नाही ?

मुलगा: फॅशन आहे आई.

.

.

.

.

आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय

लहान मुलगी पसंत आहे म्हणून. आता जा नांदायला

4. #बाबा: #पोरी,मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?

मुलगी: काही नाही.

आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?

बाबा: योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा.

फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

5. मुलगा: आई दिवाळीला मि ह्या दुकानातुन फटाकड्या घेणार

आई: नालायक हे फटाकड्याचं दुकान.नाय मुलिंचे हॉस्टेल आहे

मुलगा: मला काय माहित पप्पा एकदा म्हणत होते हितं एका पेक्षा एक फटाकडया आहेत

आई: हो का .. आता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील..

हेही वाचा- World Smile Day : बॉलिवूड सेलिब्रेटींचे 'हे' फोटोज पाहुन हसून हसून लोटपोट व्हाल !

हे भन्नाट जोक्स ऐकून नक्कीच तुम्ही खळखळून हसला असाल, तुमच्या कडेही असे किंवा याहून सरस असे जोक्स असतील तर आम्हाला नक्की कळवा.