इंदिरा गांधी (Indira Gandhi), भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढून देश आणि जगभर चर्चेत असलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आजी. ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी केली. त्यामुळे त्यांना 'आयर्न लेडी ऑफ इंडिया' (Iron Lady of India) म्हणूनही ओळखले जाते. अशा या व्यक्तीमत्वाची आज जयंती. इंदिरा गांधी यांची जयंती (Indira Gandhi Birth Anniversary) दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. इंदिरा गांधी (Indira Gandhi Quotes) यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार.
इंदिरा गांधी यांना राजकीय वारसा घरातूनच मिळाला. त्याचा त्यांनी एकूण राजकीर्दीत चपकल वापर केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून काही चुकाही जरुर झाल्या. जसे की त्यांनी लागू केलेल्या आणिबाणीवर अनेकदा टीका होते. पण, पुढच्या काळात त्यांनी प्रचंड मुत्सद्दीगिरी दाखवली. ज्यामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. (हेही वाचा, Indira Gandhi Death Anniversary: विश्वासघाताने अशी घडली होती इंदिरा गांधींची हत्या; 80 बाटल्या रक्त चढवूनही नाही वाचले प्राण )
इंदिरा गांधी यांचे 10 प्रेरणादायी विचार
- लोक आपली कर्तव्ये विसरतात पण हक्क लक्षात ठेवतात- इंदिरा गांधी
- मी दीर्घायुष्य जगले आहे आणि मला अभिमान आहे की मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या लोकांच्या सेवेत घालवले. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहीन आणि जेव्हा मी मरतो तेव्हा मी म्हणू शकतो की माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला स्फूर्ती देईल आणि मजबूत करेल- इंदिरा गांधी
- काम करणारे आणि श्रेय घेणारे असे दोन प्रकारचे लोक असतात. पहिल्या गटात राहण्याचा प्रयत्न करा; तेथे स्पर्धा कमी आहे- इंदिरा गांधी
- आम्ही यापुढे पर्यावरणाची दुरवस्था करू इच्छित नाही आणि तरीही मोठ्या संख्येने लोकांची भीषण गरिबी आम्ही क्षणभरही विसरू शकत नाही.- इंदिरा गांधी
- जिथे इच्छा नसते तिथे प्रेम नसते- इंदिरा गांधी
- मी कोणावर दबाव आणणारी आणि सहन करणारी व्यक्ती नाही - कोणाकडून किंवा कोणत्याही राष्ट्राकडून- इंदिरा गांधी
- आपल्याला जगातील बहुसंख्य लोकांना हे सिद्ध करावे लागेल की आपण पर्यावरण आणि संवर्धन त्यांच्या हिताच्या विरोधात काम करणार नाही. आपण त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करु- इंदिरा गांधी
- क्षमता नेहमी परीक्षेद्वारे मोजली जात नाही- इंदिरा गांधी
- कोणत्याही कृतीबद्दल पूर्वतयारी ठेवा. आपण जेव्हा कोणत्याही मोठ्या कृतीला छोट्या टप्प्यांमध्ये परावर्तीत करु शकतो तेव्हा आपण लगेच दुसरे पाऊल उचलू शकतो- इंदिरा गांधी
- आम्हाला लोकशाही महत्त्वाची वाटते. कारण लोकशाही तुम्हाला छोटे स्फोट करण्याची परवानगी देते आणि ज्यामुळे मोठे स्फोट टाळतात- इंदिरा गांधी
इंदिरा गांधी या स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. इंदिरा गांधी या भारताच्या दुसर्या क्रमांकाच्या सर्वात लोकप्रीय आणि शक्तीशाली पंतप्रधान होत्या. त्यांनी पंतप्रधान म्हणून 1966 ते 1977 या काळात पहिली टर्म आणि 1981 ते 1984 पर्यंत दुसरी टर्म केली.