अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सावासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभुमीवर 'बॉर्डरचा राजा' (Border Cha Raja) हा मुंबईहून जम्मू-कश्मीर मधील पुंछ येथील मंदिरासाठी रवाना झाला आहे. तर ही पहिलीच वेळ नसून याआधी सुद्धा पुंछ येथे बाप्पा मुंबईहून पाठवण्यात आला होता. किरनबाला इशार यांना इश्वर दिदी नावाने ओळखले जात असून त्या गेल्या सहा वर्षांपासून एनजीएओच्या अंतर्गत प्रोग्रेसिव्ह नेशन च्या माध्यमातून बाप्पा साकारत आहेत.(Ganesh Chaturthi 2021 Invitation Card In Marathi: गौरी-गणपतीच्या दर्शनाला आप्तजनांना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Messages, निमंत्रण नमुने)
पुंछच्या मंदिरात हा बाप्पा सैनिकांसह त्यांच्या परिवाराची रक्षा करण्यासाठी स्थापन केली जाते. मी आणि माझ्या परिवाराचा गणपती बाप्पावर खुप विश्वास आहे. मी आर्मी परिवारातील असून हा बाप्पा गेल्या 6 वर्षांपासून माझ्या हातून घडवला जात आहे. गणेशोत्सव हा माझ्यासाठी महत्वाचा सण आहे.(Ganesh Chaturthi 2021 Date: या वर्षी कधी होणारा गणपती बाप्पाचे आगमन, जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त)
बाप्पाची मुर्ती ही कलाकार विक्रांत फडतरे यांनी साकारली असून ती गेल्या 6 वर्षापासून कुर्ला येथे बनवली जाते. यंदाच्या वर्षी फडतरे यांनी गणेशमुर्तीसाठी एक स्पेशल डेकोरेशन सुद्धा तयार केले आहे.सजावटीबद्दल बोलताना ईशर म्हणाले, "बाप्पा भारत पाकिस्तान सीमेवर जात असल्याने, आम्हाला मुंबईत राहणाऱ्या लोकांना या दृश्याद्वारे जाणीव करून द्यायची आहे की, देश हा अफगाणिस्तानची राजधानी तालिबानने ताब्यात घेतलेल्या सीमेपासून फक्त 600 किलोमीटर दूर आहे. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की तेथे किती भीती आहे. " सुंदर मूर्तीमागील कलाकार पांड्रे यांनी अभिमान व्यक्त केला की, त्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींची जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांपासून पूजा केली जाते.