
Date of Ganesh Chaturthi 2021: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, ज्याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तारखेपासून चतुर्दशीपर्यंत चालतो. यानंतर चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते. पौराणिक कथेनुसार गणपतीचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांचे दुःख दूर होते. भारतीय संस्कृतीत, गणेशाला ज्ञान प्रदाता, विघ्न-विनाशक, मंगलकारी, रक्षाकारक, सिद्धिदायक, समृद्धि, सामर्थ्य आणि सन्मान प्रदान करणारा मानला जाते. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रांतांमध्ये गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) म्हणून साजरे केले जाते आणि 10 दिवसांपर्यंत त्यांची पूजा केली जाते. यंदाचा गणेशोत्सव (Ganeshotsav) सप्टेंबर महिन्यात साजरा केला जाईल. (Ganesh Chaturthi 2020: गणेश चतुर्थी ला चंद्राला पाहणं का टाळतात? जाणून घ्या चंद्र दर्शन न करण्याची वेळ )
कधी आहे गणेश चतुर्थी 2021?
या वर्षी गणेश चतुर्थीचा पवित्र सण शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 रोजी येत आहे. वैदिक ज्योतिषानुसार मध्यान्ह हा गणेश पूजेसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. या दरम्यान, गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अडथळे आणि त्रास दूर होतात. या दिवशी पूजेचा शुभ वेळ मध्य-दिनाच्या कालावधीत 11:03 ते 13:33 पर्यंत आहे म्हणजे 2 तास आणि 30 मिनिटांसाठी आहे.
गणेश चतुर्थी चा शुभ मुहूर्त
चतुर्थी तिथीची सुरुवात - शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 12:18 पासून
चतुर्थी तिथीची समाप्ती - शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 ते 21:57 पर्यंत
महाराष्ट्रात (Maharashtra) गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा ही गेल्या वर्षीप्रमाणेच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे उत्सवात मोठा फरक दिसणार आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन आगामी सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.