'भारताचा स्वातंत्र्यदिन' (India Independence Day 2021) देशभरात साजरा होतो आहे. गूगल डूडल (Google Doodle) च्या रुपात जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखले जाणाऱ्या गूगलनेही 'भारताचा स्वातंत्र्यदिन' साजरा केला आहे. आजचे गूगल डूडल (India Independence Day 2021 Google Doodle) काहीसे खास आहे. या डूडलचे डिजाईन कोलकाता येथील गेस्ट आर्टिटस्ट सयान मुखर्जी यांनी बनवले आहे. गूगल डूडलमध्ये भारतातील स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील विविध नृत्यांचे चित्रण करण्यात आले आहे. हे संपूर्ण चित्र देशातील ऐतिहासिक प्रगती आणि शतकांपासून चालत आलेल्या परंपरा दाखवते. केवळ गूगलच नव्हे तर त्यासोबतच विविध कारणांमुळे जगभरातील विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेले भारतीयही स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत
भारतायच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त Google ने म्हटले आहे की, 1947 या दिवशी मध्य रात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारतासाठी सुरु असलेले आंदोलन समाप्त झाले. या आंदोलनाचा शेवट गोड झाला. (हेही वाचा, Sarla Thukral Google Doodle: भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या 107 व्या जन्मदिना निमित्त खास डूडल)
भारताच्या विविध सांस्कृतीक परंपरांवर विस्ताराने सांगत गूगलने म्हटले आहे की, भारत हा जागतीक लोकसंख्येचा एक आठवा भाग आहे. भारताची लोकसंख्या 1.3 बिलियन असल्याच्या आसपास आहे. असे असूनही भारतातील विविध भाषा, जाती आणि समूह हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण भारत देश आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याचे हे अमृतमहोत्सवी वर्ष (Azadi ka Amrit Mahotsav) आपणा सर्वांच्या आयुष्यात नवी चेतना, नवी उर्जा घेऊन येईल असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि त्यासोबतच सर्वसामान्य जनतेनेही एकमेकांना 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतो आहे.