इंटरनेट जगतामध्ये आघाडीचे सर्च इंजिन गूगलने (Google) आज होमपेज वर आज सरला ठकराल (Sarla Thukral) यांना डूडलच्या (Doodle) माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. सरला या देशातील पहिल्या महिला पायलट (India’s First Woman Pilot) आहेत. आज 8 ऑगस्ट दिवशी त्यांचा 107 वा जन्मदिवस आहे. या दिवशी गूगलने त्यांना खास डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे.
सरला ठकराल यांचं गूगल कडून दुसर्यांदा हे डूडल झळकले आहे. मागील वर्षी केरळ मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेच्या वेळेस देखील हे डूडल ठेवण्यात आले होते. गूगलने जारी केलेल्या स्टेटमेंट मध्ये आम्ही एकच डूडल दोनदा साकारत नाही पण सरला ठकराल अपवाद आहेत. त्यांच्यामुळे एव्हिएशन क्षेत्रातील महिलांना प्रेरणा मिळते त्यामुळे आज त्यांच्या 107 व्या बर्थ डे निमित्त पुन्हा त्यांना आदरांजली म्हणून हे डूडल साकारण्यात आले आहे. नक्की वाचा: Kadambini Ganguly Google Doodle: डूडल साकारुन गूगल साजरी करतंय कादंबिनी गांगुली यांची 160 वी जयंती.
सरला ठकराल त्यांच्या पतीचा आदर्श घेऊन एव्हिएशन क्षेत्रामध्ये उतरल्या. वयाच्या 21 व्या वर्षी पारंपारिक साडी नेसून त्यांनी कॉकपीट मध्ये पाऊल ठेवलं. त्यांचं पहिलं सोलो फ्लाईट हे छोटं डबल विंग्ड प्लेन होतं. Lahore Flying Club मधून ठकराल शिकल्या होत्या. त्या पहिल्या भारतीय वैमानिक होत्या ज्यांनी लायसन्स मिळवण्यासाठी 1000 तास फ्लाईट टाईम पूर्ण केला होता. त्यांनी कमर्शिअल पायलट होण्याचा निर्णय घेतला तेव्हा वर्ल्ड वॉर 2 सुरू झालं होतं. मग या अडथळ्यामुळे त्या Lahore’s Mayo School of Arts मध्ये फाईन आर्ट आणि पेंटिंग शिकल्या. नंतर त्या दिल्ली मध्ये परतल्या आणि ज्वेलरी, क्लोथिंग मध्ये डिझायनिंग क्षेत्रात काम करू लागल्या. त्यांनी या क्षेत्रातही आपलं करियर बसवलं.