Homemade Vastra Mala for Ganesh Chaturthi (Photo Credits: YouTube)

दरवर्षी प्रत्येक गणेशभक्त ज्या सणाची आतुरतेने वाट पाहात असतो तो गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा कोरोना व्हायरसचे या सणावर सावट असले तरीही घरच्या घरी अगदी साधेपणाने आपल्या कुटूंबासोबत हा सण तुम्ही साजरा करु शकता. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी एव्हाना सर्वांकडे जोरदार तयारी सुरु झाली असेल. गणपतीच्या मूर्तीपासून ते डेकोरेशनपर्यंत काय करावे आणि काय करु नये असे प्रत्येकाचे झाले असेल. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व साहित्य जवळ करण्याचे काम सध्या सुरु असेल. यात कापसापासून बनवलेल्या वस्त्रमाळा बनविण्याच्या विचारात जर तुम्ही असाल तर तुमच्या हे व्हिडिओज नक्की कामी येतील.

आपल्या घरातील गणपतीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने छान आणि सुरेख अशा वस्त्रमाळा बनवू शकता. ज्यासाठी तुम्हाला लागणा-या वस्तू अगदी सहज उपलब्ध होतील.

हेदेखील वाचा- Ganesha Whatsapp Stickers Download: गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' सोप्प्या स्टेप्स वापरुन डाउनलोड करा बाप्पाचे व्हॉटसअ‍ॅप स्टिकर्स

हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2020 E-Invitation Cards For Virtual Celebrations: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान ठेऊन पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी खास WhatsApp Messages आणि Images

कंठीच्या स्वरूपातील या सुंदर वस्त्रमाळा तुमच्या गणपती बाप्पांवर छान उठून दिसतील. त्याचबरोबर यासाठी लागणा-या वस्तू तुम्हाला सहजपणे वा अगदी घरातही उपलब्ध होतील अशा आहेत. ज्यासाठी तुम्हाला जास्त वणवणही करावी लागणार नाही. मग वाट कसली बघताय लागा तयारीला!