पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी पाणी हा अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. पण वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण पाहता आजही जगभरात गरजेपुरता पाण्यासाठी देखील अनेक लोकांना वणवण करावी लागत आहे. जगात आजही पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवणं हा कित्येकांसाठी संघर्षाचा विषय बनला आहे. म्हणूनच पाण्याचा अपव्यय टाळून प्रत्येकाला किमान पिण्यासाठी सुरक्षित, स्वच्छ पाणी मिळावं या उद्देशापायी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन (World Water Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राकडून त्यासाठी विविध उपाययोजना, कार्यक्रम राबवले जातात. यंदा 22 मार्च 2021 चा हा जलदिन “Valuing Water” या थीमवर साजरा केला जाईल. मग पाणी हे जीवन समजल्या जाणार्या या जीवनावश्यक गोष्टीबद्दल समाजात जागृती निर्माण करण्यासाठी, त्याच महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच त्याचा अपव्यय टाळून योग्यरित्या वापर करून पाण्याचे नियोजन करण्यासाठी यंदाच्या वर्ल्ड वॉटर डे दिवशी पाण्याशी निगडीत काही Quotes, Wishes, Greetings सोशलमीडियात Facebook Messages, WhatsApp Status द्वारे शेअर करून हा दिवस साजरा करा.
जागतिक जल दिन साजरा करण्याचा आंतरराष्ट्रीय पुढाकार ब्राझीलमध्ये 22 मार्च 1992 रोजी रिओ दि जानेरो येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकासाच्या परिषदेत घेण्यात आला. 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने महासभेत हा दिवस वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. नक्की वाचा: World Water Day 2021: 'जागतिक जल दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या या मागील इतिहास आणि काही रोचक तथ्य.







सध्या अवघं जग कोविड 19 या विषाणूसोबत लढत आहे. या जागतिक आरोग्य संकटात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित राहण्यासाठी नियमित स्वच्छता पाळणं गरजेचे आहे. हात वारंवार साबणाने धुण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे आता पाण्याची गरज काय आहे हे देखील आपल्यापैकी अनेकांना समजलं असेल. यंदाच्या वर्षी असलेली “Valuing Water” थीमला अनुसरून पाण्याचा विचारपूर्वक वापर करणं आवश्यक आहे.