World Students’ Day 2020 Greetings: भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) यांचा 15 ऑक्टोबर रोजी जन्मदिवस. अब्दुल कलामांचा जन्मदिवस जागितक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. अब्दुल कलाम यांचे विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, आपुलकी त्यांच्या कामातून दिसून आली. त्यामुळे युनाडेट नेशन्सने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2010 साली पहिला जागतिक विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. यंदा 10 वा जागतिक विद्यार्थी दिन साजरा होत आहे. जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश, मेसेजेस, ग्रिटींग्स, HD Images. सोशल मीडियाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या विविध माध्यमातून हे शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्यात येतो. तसंच या निमित्ताने डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार, मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले जातात. यंदाचा जागतिक विद्यार्थी दिन Learning for people, planet, prosperity and peace या थीमवर साजरा केला जाणार आहे. (World Students' Day 2020: डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो जागतिक विद्यार्थी दिन; जाणून घ्या यंदाची थीम, इतिहास आणि महत्त्व)
जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा!
WhatsApp Stickers च्या माध्यमातून द्या जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा:
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन ‘World Students’ Day WhatsApp Stickers’ टाईप करुन स्टिकर्स डाऊनलोड करा आणि शेअर करा.
GIF:
विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर देशाच्या विकासाचे भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना समर्पित करणारा एक दिवस असायला हवा. त्यासाठी विद्यार्थी दिन साजरा केला जातो. तसंच विद्यार्थ्यांना महत्त्व देणे आणि त्यांचे समाजातील महत्त्व जाणणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.