जगभरात 7 एप्रिल हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी विशिष्ट थीम वर या जागतिक आरोग्य दिवसाचं सेलिब्रेशन केलं जातं. यंदा 'My Health, My Right.' या थीम वर या आरोग्य दिनाचं सेलिब्रेशन केलं जाणार आहे. या वर्षीची थीम सर्वत्र उत्तम आरोग्य सेवा, शिक्षण आणि माहिती, तसेच सुरक्षित पिण्याचे पाणी, शुद्ध हवा, चांगले पोषण, दर्जेदार घरे, योग्य काम आणि पर्यावरणीय परिस्थिती आणि स्वातंत्र्य या सर्वांचा हक्क मिळवण्यासाठी निवडण्यात आली आहे. WHO च्या माहितीनुसार जगात निम्म्याहून अधिक लोकांकडे किमान आरोग्य सेवा देखील नाही. हा 2021 चा डाटा आहे. अशात सर्वांना आरोग्य सेवांसाठी उपलब्ध मार्गांची माहिती देण्यासाठी आजचा हेल्थ डे थोडा अधिक स्पेशल करा.
जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधत आज तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना, नातेवाईकांना, मित्रमंडळींना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देत हा दिवस सेलिब्रेट करू शकाल.
आरोग्य दिनाच्या शुभेच्छा !
जागरुकता वाढवण्यासोबतच, जागतिक आरोग्य दिन हा लोकांना त्यांच्या आरोग्य आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आवाहन करतो. हे लोकांना आहार, फिजिकल अॅक्टिव्हिटी आणि आरोग्यसेवा शोधण्यासह माहितीपूर्ण जीवनशैली निर्णय घेण्यास प्रोत्साहित करते. व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम बनवून, जागतिक आरोग्य दिन शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि सर्वांसाठी निरोगी भविष्य सुनिश्चित करण्याच्या जागतिक प्रयत्नांना हातभार लावतो.