Happy Vat Purnima 2019: घरातील सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावे, प्राप्त होईल सुख-समृद्धी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Happy Vat Purnima 2019: जेष्ठ शुल्क पक्षातील पौर्णिमा तिथीला 'वटपौर्णिमा' असे म्हटले जाते. महिलांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवसांपैकी हा एक दिवस आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा करुन तिला प्रसन्न केले जाते. तसेच महिला या दिवशी उपवास ठेवत पुढील सात जन्मात हाच नवरा मिळू दे यासाठी प्रार्थना करतात.

तर शास्रानुसार महालक्ष्मीच्या कृपेशिवाय पैशांसबंधित कामे पार पडत नाही असे मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीवर देवी प्रसन्न असते त्यांना आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासत नाही. शास्रामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत.तर सुवासिनींनी प्रथम सकाळी 'हे' कार्य करावीत. त्यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होईल.

> सुवासिनीने प्रथम सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यावर मुख्य दरवाज्यासमोर तांब्याच्या कलशातील पाणी शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच असे केल्याने देवी-देवतांची कृपा आपल्यावर राहते.

> प्राचीन मान्यतेनुसार प्रातःकाळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करते. या दरम्यान ज्या घरांमध्ये स्वच्छता आणि पवित्रता असते, त्या घरात लक्ष्मी वास करते. तांब्याच्या कलशाने घरासमोर पाणी शिंपडल्यास आणि स्वच्छता केल्यास घराजवळील वातावरण पवित्र होते. नकारत्मक उर्जा नष्ट होते.

>जेव्हा घरातील वातावरण पवित्र होते तेव्हा सर्व देवी-देवतांची कृपा आपल्या घरावर राहते. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी, धनाचा वास राहतो. त्यामुळे हा उपाय सुख-समृद्धीला शक्ती प्रदान करणारा आणि सकारात्मक उर्जा निर्माण करणारा मानला गेला आहे.

>तांब धातूला पवित्र मानण्यात आले आहे. तसेच तांब्याच्या कलशात ठेवलेले पाणी औषधीय गुणयुक्त होते. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्यास त्वचासंबंधी रोगांचा नाश होतो.

(Vat Purnima 2019: जाणून घ्या वटपौर्णिमा सणाचे महत्व, उद्देश आणि पूजा विधी)

वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो म्हणून प्रामुख्याने वडाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीचीच पूजा करण्यासारखे आहे.