Vasu Baras | (File Pic)

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस (Vasu Baras). वसुबारसेपासून दिवाळी खऱ्या अर्थाने सुरु होते. त्यामुळे वसुबासेच्या (Vasu Baras 2020) दिवसापासूनच दिवाळी शुभेच्छा द्यायला सुरुवात होते. अर्थात काही मंडळी वसुबारसेच्या खास स्वतंत्र शुभेच्छाही (Happy Vasu Baras 2020) देतात. त्यामुळे आपणही अशा लोकांमध्ये येत असाल तर खास आपल्यासाठी वसुबारस स्पेशल HD Greetings, Wallpapers, Wishes इथे आहेत. जे आपण फ्री डाऊनलोड करुन शेअर करु शकता आणि आपल्या मित्रांना शुभेच्छा देऊ शकता. ज्यामुळे दिवाळीचा आनंद आपण आपल्या मित्र, आप्तेष्ट आणि संबंधितांना शुभेच्छा देऊन आपला आनंद द्विगुणीत करु शकता.

अश्विन महिन्यात येणाऱ्या वद्य द्वादशीस गोवस्त द्वादशी असेही म्हटले जाते. ज्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारसेला गोठ्यातील गाईची पूजा केली जाते. आख्यायिका सांगितली जाते की समुद्रमंधन केल्यानंतर पाच कामधेनू निर्माण झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक एक कामधेनू होती. या धेनूस उद्देशून वसूबारसेस हे व्रत केले केले जाते. (हेही वाचा, Vasu Baras 2020 Date and Significance: वसुबारस तारीख, महत्त्व आणि परंपरा)

Vasu Baras | (File Pic)

 

Vasu Baras | (File Pic)

 

Vasu Baras | (File Pic)

 

Vasu Baras | (File Pic)

 

Vasu Baras | (File Pic)

 

वसू बारसेच्या दिवशी घरातील सवाष्ण महिला गोठ्यातील गाईच्या पायावर पाणी घालतात. तिच्या मस्तकी हळद, कुंकू लावतात. तिला फुले, अक्षता वाहतात. तिच्या गळ्यात फुलांची माळ घालतात. मग निरंजनाने तिला ओवळतात आणि केळीच्या पानावर पुरणपोळी आणि इथर गोडाधोडाचा नैव्यद्य खाऊ घालतात. घरातील पती, मुले बाळे यांना दीर्घायू आणि सुदृढ आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी या महिला या दिवशी उपवास करतात. काही महिला व्रत पाळतात.