व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) मधील चौथा दिवस हा टेडी डे (Teddy Day) म्हणून साजरा केला जातो. प्रामुख्याने मुलींना टेडी या दिवशी प्रेमाचं प्रतिक म्हणून गिफ्ट केलं जात. साध्या किचन पासून अगदी अवाढव्य टेडी देखील गिफ्ट केला जातो. प्रत्यक्षात टेडी देऊन हा दिवस साजरा करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला सोशल मीडीयात WhatsApp Status, Messages, Wishes, Greetings मधून या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी सोशल मीडीयात तुम्ही लेटेस्टी कडून तयार करण्यात आलेली ही खास ग्रिटिग्स शेअर करू शकता.
टेडी बेअर हे गिफ्टिंग ऑप्शन मधील एक सहज एकमेकांना दिलं जाणार गिफ्ट आहे. अनेकदा आपल्या मनातील भावना बोलण्यासाठी टेडी हे एक माध्यम मानून त्याच्याशी बोललं जातं. टेडीचा गोंडसपणा तुमच्या नात्यामध्येही रहावा म्हणून देखील या दिवसाकडे बघतात. नक्की वाचा: Valentine’s Day 2023 Gift Ideas: जोडीदाराला द्या हटके गिफ्ट, दणक्यात साजरा करा व्हॅलेंटाईन डे .
टेडी डे च्या शुभेच्छा
माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू...
काय सांगू माझ्यासाठी क्युट टेडी बियर आहेस तू...!
'टेडी डे'च्या शुभेच्छा !
टेडी डे 2023 च्या शुभेच्छा
मला तुझी आयुष्यभर साथ नकोय
तर तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस
तोपर्यंत आयुष्य हवंय...
'टेडी डे'च्या शुभेच्छा!
हॅप्पी टेडी डे !
माझ्या हर एक वेदनेचं औषध आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू...
काय सांगू माझ्यासाठी क्युट टेडी बियर आहेस तू...
'टेडी डे'च्या शुभेच्छा !
टेडी सारख्या माझ्या आयुष्यातील
सार्याच 'गोड' व्यक्तींना
मनापासून शुभेच्छा !
सॉफ्ट टॉईज असलेल्या टेडी बेअरला घट्ट मिठी मारून झोपल्याने शरीरात हॅप्पी हॉर्मोन्स रिलीज होतात. परिणामी अनावश्यक घेतलेला ताण, टेंशन कमी होण्यास मदत होते. हे संशोधनातूनही समोर आलेले निरीक्षण सांगते. मग तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यातही ताण हलका करण्यासाठी आजच्या दिवशी किमान मेसेज दवारा टेडी पाठवा आणि त्याच्या चेहर्यावर एक मस्त स्माईल येईल यासाठी प्रयत्न करा. हॅप्पी टेडी डे!