
Republic Day 2020 Marathi Quotes: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश 150 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. हा दिवस देशात ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना, 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. त्यामुळे 26 जानेवारीला भारतात सर्वत्र भारतीय प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होतो. यंदाचा हा 71 वा प्रजासत्ताक दिन असणार आहे.
26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेत भारताचे संविधान मंजूर करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी 10 वाजून 18 मिनिटांनी ते संपूर्ण देशात लागू करण्यात आले.
जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी इ.स. 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून, पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. हा दिवस संपूर्ण देशात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या लोकांना शुभेच्छा देण्यासाठी, आम्ही देत आहोत काही वीर पुरुषांचे महत्वाचे कोट्स. (हेही वाचा: Republic Day 2020: सरकारकडून प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु; जाणून घ्या कोण असतील यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे)






दरम्यान, 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावरून एका मोठया परेडचे आयोजन करण्यात येते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे, रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. 2016 साली 67 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासननाच्या शिष्ट समितीतर्फे मरीन ड्राईव्ह येथेही एक संचलन आयोजित करण्यात आले होते.