
71st Republic Day Marathi Greetings: प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव भारतामध्ये 26 जानेवारी दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 दिवशी भारत देशामध्ये राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी दिवशी देशभक्तीपर मेसेजेस, संदेश, ग्रीटींग़्स एकमेकांना देऊन हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहाने देशाच्या कानाकोपर्यात साजरा केला जातो. यंदा भारत देश 71 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करत आहे. मग या दिवसाचं औचित्य साधून जगाच्या कानाकोपर्यात पसरलेल्या भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा (Republic Day Wishes), देशभक्तीपर मेसेजेस, मराठी संदेश, ग्रीटिंग्स, फोटो यांच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन आजचा दिवस खास करा. आज इंटरनेट आणि सोशल मीडीयाच्या विविध माध्यमांच्या वापर करून जगात कुठेही अवघ्या काही क्षणांत मेसेज पोहचवता येतो. मग आज फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअॅप स्टिकर्स, स्टेटसच्या माध्यमातून 71 व्या भारतीय गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा (Gantantra Diwas), ग्रीटींग्स शेअर करायच्या असतील तर ही काही मराठमोळी शुभेच्छापत्र तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. Republic Day Special Recipes: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या रंगातील '5' हटके आणि स्वादिष्ट रेसिपीज; Watch Video.
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून दिल्लीपासून गल्लीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यंदा देखील अशा कार्यक्रमांची चंगळ आहे. परंतू तुम्हांला तुमच्या नातलगांना, प्रियजनांना, मित्रमैत्रिणींना भारताच्या 71व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, हाईक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून HD Images, Greetings, SMS, GIFs, WhatsApp Stickers अशा माध्यमातून द्यायची असतील तर ही 'लेटेस्टली मराठी' ने साकारलेली खास मराठमोळी ग्रीटिंग्स तुम्ही नक्की शेअर करू शकता.
प्रजासत्ताक दिन 2020 मराठी ग्रीटिंग्स





सोशल मीडीयावर गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासोबतच आता व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपने मराठी भाषेतही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याची खास सोय सुरू केली आहे. मग यंदा तुम्हांला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून द्यायच्या असतील तर गूगल प्ले स्टोअरवरून स्टिकर्स डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 साली मिळाले असले तरीही 26 जानेवारी 1950 पासून भारताचं लोकशाही पर्व अस्तित्त्वामध्ये आले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला त्यामुळे 26 जानेवारी ही तारीख देखील तितकीच महत्त्वाची असल्याने या दिवसाचा आनंद, उत्साह प्रत्येक भारतीयासोबत सेलिब्रेट करा.