Republic Day 2020: येत्या 26 जानेवारीला सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाईल. या दिवशी काही ठिकाणी परेड होतील, कुठे प्रभात फे-या होतील, कुठे भाषण होतील, कुठे मार्चचे आयोजन केले जाईल तर कुठे सांस्कृतिक कार्यक्रमही. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आणले गेल्याने हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला रोजी स्वतंत्र झाला मात्र त्याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी फार महत्त्वाचा आहे. भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.
अशा या बहूमुल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तिरंग्यांच्या रंगातील 5 हटके आणि स्वादिष्ट रेसिपीज:
त्रिरंगा रवा ढोकळा
त्रिरंगी डेजर्ट
त्रिरंगी इडली
त्रिरंगी सँडविच
त्रिरंगी पुलाव
26 जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावरून एका मोठया परेडचे आयोजन करण्यात येते. रायसीना हिल ते राष्ट्रपती भवन या राजपथावरून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. हे पथसंचलन “याची देही याची डोळा” या ओळींप्रमाणे डोळयांचे अक्षरशः पारणे फेडते.
हा दिवस साजरा करण्याचे प्रकार हे प्रत्येकाचा जरी वेगवेगळे असले तरी सर्वांचा उद्दिष्ट एकच असला पाहिजे तो म्हणजे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती कायम राहिले पाहिजे.