
Republic Day 2020 Marathi Messages: दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारी 2020 रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे, साहजिकच एक भारतीय या नात्याने आपणही सर्व या दिवसासाठी उत्साही असाल. या दिवशी 1950 साली भारताच्या जडणघडणीचा पाया म्हणजेच संविधान अंमलात आणण्यात आले, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेच्या हाती सत्ता देणारा व लोकशाहीचा आनंद साजरा करणारा दिवस म्हणून पहिला जाऊ लागला. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. अलीकडे धावत्या आयुष्यात प्रत्येक सणाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या मंडळींना भेटणे शक्य होईलच असे नाही, पण तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून कमीत कमी वेळात आणि जास्तीत जास्त प्रभावीपणे शुभेच्छा देऊन तुम्ही ही सेलिब्रेशनची कसर भरून काढू शकता. तुम्हाला या शुभेच्छा शोधण्यासाठी सुद्धा मेहनत पडू नये याकरिता देखील आम्ही सोय केलेली आहे. या प्रजासत्ताक दिनी मराठी संदेश, Wishes, Greetings, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून तुमच्या जवळच्या मंडळींना शुभेच्छा देत तुम्ही हा आनंद साजरा करू शकाल.
तनी मनी बहरूदे नवा जोम
होउदे पुलकित रोम रोम
हा तिरंगा घेऊन हाती,
नभी लहरवू उंच उंच
जयघोष मुखी
जय हिंद, जय भारत.. गर्जुदे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय.
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज,
सूर्य तळपतो प्रगतीचा,
भारतभूच्या पराक्रमाला मुजरा मानाचा
प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा

स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

खरंतर केवळ राष्ट्रीय सणाच्या दिवशीच तुम्हाला शुभेच्छा देण्याचा विचार का येतो असा प्रश्न अनेक जण करत असतात, तेव्हाच तुमचे देशप्रेम जागे होते का असेही सवाल आपण ऐकले असतील,मात्र दररोज ज्या देशावर आपण प्रेम करतो ते प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे, त्यामुळे प्रत्येकाने अगदी आवर्जून हा दिवस साजरा करायला हवा.तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठी परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!