Happy New Year 2024 in Advance Wishes: नववर्षाच्या शुभेच्छा अ‍ॅडव्हान्समध्ये देणारी मराठमोळी Greetings, Messages, Photos!
Happy-New-Year-2024 | File Image

Happy New Year Marathi Wishes: 2023 ला निरोप देत आता 2024 मध्ये लवकरच प्रवेश होत असल्याने सध्या अनेक ठिकाणी सेलिब्रेशनचे रंग पहायला मिळत आहे. यंदा नववर्ष विकेंडला जोडून आल्याने अनेकजण जंगी सेलिब्रेशन करण्याच्या मोड मध्ये आहेत. मग या नव्या वर्षाच्या शुभेच्छा (New Year Wishes) तुम्ही तुमच्या प्रियजनांना 31 डिसेंबरच्या रात्रीच्या आधीच पाठवून नववर्ष सेलिब्रेशन मध्ये सहभागी होणार असाल तर या शुभेच्छा WhatsApp Status, Greetings, HD Images, Photos, Messages, Wishes च्या माध्यमातून नक्की शेअर करू शकता.

ग्रेगेरीयन कॅलेंडरनुसार, 1 जानेवारीपासून नव्या वर्षाची सुरूवात होते. यंदा नव्या वर्षाचा पहिला दिवस हा आठवड्याची देखील सुरूवात आहे. मग या नव्या वर्षाच्या, नव्या महिन्याच्या आणि नव्या आठवड्याची सुरूवात थोडी खास करा. New Year:  भारतातील कोणत्या राज्यातील लोक नववर्षाला सर्वाधिक दारू पितात? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? चला तर मग उत्तर जाणून घेऊयात .

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

New Year | File Image
New Year | File Image
New Year | File Image
New Year | File Image
New Year | File Image

जगभरात नवीन वर्षाचा उत्सव हा गेले 4000 वर्षे साजरा होत आहे. पृथ्वीवर दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूहावरील टोंगा हा देश सर्वात आधी नवीन वर्ष साजरे करतो. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हेदेखील नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. त्यानंतर यानंतर न्यूझीलंड, सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो. अखेर सर्वात शेवटी हॉलँड आणि बेकर या निर्जन बेटांवर नवीन वर्ष सुरु होते.

नव्या वर्षाची सुरूवात अनेकजण त्यांच्या आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी खास संकल्पाने करतात. हा संकल्प करताना वर्षभराचे नियोजन अपेक्षित असतं. आपल्यातील काही दुर्गुणांवर मात करण्यासाठी खास प्रयत्न केले जातात. मग नव्या वर्षाची सुरूवात तुमच्या सह तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तींसाठी देखील सकारात्मक करण्यासाठी या शुभेच्छा नक्की शेअर करा.