Happy Narak Chaturdashi 2019 Images: नरक चतुर्दशी निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन 'दीपावली' च्या शुभेच्छा!
Narak Chaturdashi Wishes | File Image

Happy Narak Chaturdashi Images and Wishes in Marathi: दिवाळीच्या दिवसांमध्ये वसूबारस,धनतेरस नंतर येणारा सण म्हणजे नरक चतुर्दशी (Naraka Chaturdashi). यंदा 27 ऑक्टोबर दिवशी नरक चतुर्दशी साजरी करून दिवाळीचं स्वागत केलं जाणार आहे. हिंदू परंपरेनुसार, अश्विन कृष्ण चतुर्दशी दिवशी नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. मग नरक चतुर्दशीचा सण साजरा करताना तुमच्या मित्र मैत्रिणींसोबतच, नातेवाईक, आप्टेष्टांना दिवाळी सणामधील नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा HD Images, Wallpapers च्या माध्यमातून ग्रीटिंग्स आणि मराठी संदेशाच्या माध्यमातून देणार असाल तर ही खास मराठमोळी शुभेच्छापत्र शेअर करून नक्की नरक चतुर्दशी आणि दीपावलीच्या शुभेच्छा (Deepavali Wishes) द्या आणि दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करा. दिवाळी हा नव चैतन्याचा, जल्लोषाचा, रंगबेरंगी रांगोळ्यांच्या आणि नेत्रदीपक रोषणाईचा आहे. मग तुम्हा सार्‍यांच्या आयुष्यात यंदाची दिवाळी सुख, समृद्धी, मांगल्य घेऊन येवो अशी कामना करण्यासाठी ही खास HD ग्रीटिंग्स, इमेजेस नक्की शेअर करा. नरक चतुर्दशी आणि दिवाळी शुभेच्छा शेअर करण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅपवर खास मराठमोळ्या स्टिकर्सचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. मग यंदा नरक चतुर्दशी सोबत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास मराठी ग्रीटिंग्स नक्की शेअर करा. Happy Diwali 2019 Wishes: दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा नरक चतुर्दशीचा सण!

यंदा दिवाळीमध्ये नरक चतुर्दशी दिवशीच संध्याकाळी लक्ष्मी पूजन पार पडणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाचा आनंद आणि सेलिब्रेशन डबल होणार आहे. नरक चतुर्दशी दिवशी सकाळी उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. त्यानंतर नरकासुराचे प्रतिकम्हणून कारेटी फोडली जातात. हिंदू आख्यायिकानुसार नरकासूराने प्रजेला आणि देवांनाही त्रास दिला होता. कृष्णाने त्याचा वध केला आणि सार्‍यांची त्रासातून सुटका केली. नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नान केल्याने नरकेच्या पीडेतून सुटका होते असे मानले जाते. मग या नरक चतुर्दशीचा आनंद इतरांसोबत शेअर करताना लेटेस्टली च्या टीमकडून खास बनवण्यात आलेली ही ग्रीटिंग्स नक्की शेअर करा.  Happy Diwali 2019 Messages: दिवाळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा, संदेश, मेसेज, ग्रीटींग्स आणि शुभेच्छापत्रं!

नरक चतुर्दशी आणि दिवाळीच्या शुभेच्छा देणारी HD Greetings

Narak Chaturdashi Wishes | File Image
Narak Chaturdashi Wishes | File Image
Narak Chaturdashi Wishes | File Image
Narak Chaturdashi Wishes | File Image
Narak Chaturdashi Wishes | File Image

नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Stickers कसे डाऊनलोड कराल?

आजकाल जगभरात व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप प्रामुख्याने वापरलं जाते. व्हॉट्सअ‍ॅपने वर्षभरापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स हा नवा पर्याय युजर्सना दिला आहे. इंग्रजी प्रमाणेच भारतीय भाषांमध्येही व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्ही नरक चतुर्दशीच्या शुभेच्छा देऊ शकता. गूगल प्ले स्टोअरवर दसर्‍याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स उपलब्ध आहेत. Shubha Deepavali 2019 WhatsApp Stickers: दीपावलीच्या शुभेच्छा आकर्षक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देण्यासाठी मोफत डाऊनलोड कशी कराल?

नरक चतुर्दशी पासून महाराष्ट्रात दिवाळी सणाच्या सेलिब्रेशनला खरी सुरूवात होते. नरक चतुर्दशी नंतर लक्ष्मी पूजनला घरतील लक्ष्मीचं पूजन करून सुख, समृद्धी आणि मांगल्याच्या गोष्टीचं पूजन केलं जातं. त्यानंतर साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजल्या जाणार्‍या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पती-पत्नीमधील ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी प्रार्थना केली जाते. तर दिवाळीची सांगता भाऊबीजेच्या सणाने केली जाते. यमव्दितीया म्हणून हा दिवस ओळखला जातो. बहीण-भावाचं नातं मजबूत करण्यासाठी हा सण आहे.