Happy Mother’s Day 2019 Greetings: 'मदर्स डे' च्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, HD Images,Wallpapers; आईसोबत साजरा करा तुमचा आजचा दिवस
Happy Mother's Day 2019 (Photo Credits-File Image)

 Mother’s Day HD Wallpapers & Images: आईचे आपल्या आयुष्यातील स्थान अगदी अनन्यसाधारण असते. तिचे महत्त्व, महती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पण अनेक थोरामोठ्यांनी आपल्या लेखणीतून आईची थोरवी शब्दात मांडली आहे. आज (12 मे) मदर्स डे (Mother's Day) सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? यांसारखे प्रश्न, शंका दूर सारून आजकाल तरुणाई मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा करताना दिसते. Mother's Day 2019 Wishes and Messages: मातृदिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन खास करा यंदाचा मदर्स डे!

मदर्स डेचे वैशिष्ट्य असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही पक्की ठरलेली नसते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 रोजी एक कायदा संमत केला. या कायद्यात लिहिले होते की, प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या रविवारी Mother’s Day साजरा करण्यात यावा. अमेरिकेत हा कायदा पास झाला तरी त्यानंतर भारत आणि इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. तर मदर्स डे निमित्त खास मराठमोठी ग्रिटिंग्सच्या माध्यमातून तुमच्या आईला शुभेच्छा द्या. Mother’s Day 2019 Quotes and Messages: तुमच्या आयुष्यातील आईचे महत्त्व सांगणारे हे विचार शेअर करुन आईला द्या मातृदिनाच्या शुभेच्छा!

मदर्स डे 2019 ग्रिटिंग्स

Happy Mothers Day (File Photo)
Happy Mothers Day (File Photo)
Happy Mothers Day (File Photo)
Happy Mothers Day (File Photo)
Happy Mothers Day (File Photo)
Happy Mother's Day (Photo Credits-File Image)
Happy Mother's Day (Photo Credits-File Image)

मदर्स डे साजरा करण्याच्या पद्धती व्यक्ती, संस्था आणि समाजपरत्वे विभिन्न आढळतात. काही संस्था या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. ज्यात चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिरं आदिंचा समावेश असतो. तर, काही लोक आर्थिक रुपात, किंवा वस्तू रुपात आईला भेट देतात. काही लोक आपले प्रेम व्यक्त करतात.