
महाशिवरात्र (Mahashivratri) ही हिंदू धर्मियांमधील प्रत्येक शिवभक्तासठी महत्त्वाची रात्र असते. यंदा महाशिवरात्र 1 मार्च 2022 दिवशी साजरी केली जाणार आहे. या सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी शिव शंकर हा या सृष्टीचा तारणहार आहे असे मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मीयांमध्ये शंकराची पूजा मोठ्या आत्मियतेने केली जाते. भगवान विष्णूंनी सृष्टीची निर्मिती केली व तिचे कल्याण हे भगवान शिव शंकर करतात अशी हिंदू धर्मियांची भावना आहे. त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्री दिवशी तुमच्या आयुष्यात आणि प्रियजनांवर त्याची कृपादृष्टी रहावी या प्रार्थनेसह महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी मेसेजेस, संदेश, HD Images, Greetings, Photos WhatsApp Status, Facebook Messages, Twitter, Instagram, Telegram द्वारा शेअर करत मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना देणार असाल तर ही लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ग्रिटिंग्स डाऊनलोड करून नक्की शेअर करू शकाल.
महाशिवरात्र हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस माघ वद्य चतुर्दशी दिवशी साजरा करतात. यंदा हा दिवस मंगळवार 1 मार्च दिवशी आहे. महाशिवरात्र निमित्त भोलेनाथांच्या मंदिरात पूजा-अर्चा केली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. काही शिवभक्त या दिवशी उपवास करतात. नक्की वाचा: Bank Holiday List For March 2022 in Maharashtra: मार्च महिन्यात पहा होळी, महाशिवरात्र सोबत कोण-कोणत्या दिवशी आहे बॅंक हॉलिडे!
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्री
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
या महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी
आपल्या जीवनाची होवो एक नवी सुरूवात
हीच शिवशंकराकडे प्रार्थना
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाशिवरात्र 2022 । PC: File Imagesशिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

महाशिवरात्रीच्या सार्या भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
सध्या देशभरातून कोरोना संकट निवळत असल्याचं चित्र असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहात यंदाची महाशिवरात्र साजरी करण्याचे प्लॅन्स आहेत. त्याअनुषंगाने देशभरातील शिव मंदिरं सजली आहेत. कोविड 19 नियमांचं पालन करत यंदा पुन्हा महाशिवरात्र साजरी करण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.