महाराष्ट्रात मार्च (March) महिन्याची सुरूवात महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) सुट्टीच्या दिवसाने होणार आहे. मार्च 2022 मध्ये यंदा महाशिवरात्र, होळी (Holi), धुलिवंदन (Dhulivandan) असे सण साजरे होणार आहेत. या सणांच्या निमित्ताने पहा मार्च 2022 मध्ये किती दिवस बॅंक हॉलिडे (Bank Holiday) असणार आहे. बॅंक हॉलिडे पाहून आता तुम्ही शॉर्ट ट्रीप्स, गेटवेज प्लॅन करू शकता. सोबतच तुमची बॅंकेची कामं देखील त्या नुसार पूर्ण करू शकाल
महाराष्ट्रात यंदा रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरनुसार मुंबई, नागपूर रिजनल ऑफिस मध्ये 1 मार्च महाशिवरात्र आणि 18 मार्च होळीची सुट्टी आहे. तर 12 मार्च हा दुसरा शनिवार आणि 26 मार्च हा चौथा शनिवार म्हणून सुट्टी असणार आहे. इथे पहा आरबीआय ची हॉलिडे लिस्ट!
कोविड 19 चे नियम आता शिथिल झालेले असल्याने सुट्ट्यांचा काळ पाहून अनेक जण बाहेर पडत आहेत. पण सलग सुट्ट्यांमुळे अनेकदा बॅंकेची कामं देखील खोळंबून राहतात. त्यामुळे ही गैरसोय होऊ नये म्हणून बॅंक हॉलिडेजचं गणित पाहूनच तुमची कामं मार्गी लावा.
दरम्यान मार्च महिन्यात 1 मार्चला महाशिवरात्र आणि 18 मार्चला होळी हे दोन मोठे महत्त्वाचे हिंदू सण साजरे केले जाणार आहेत. 17 मार्चला होळी पेटवली जाईल आणि 18 मार्चला धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. यानिमित्ताने एकमेकांना रंग लावत धुळवड साजरी करण्याची पद्धत आहे.