Happy Kojagiri Purnima Images 2020:  कोजागिरी निमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes सोबत व्यक्त व्हा आणि शुभेच्छा देत साजरी करा 'आश्‍विनी पौर्णिमा

शरद ऋतूतील आश्विन महिन्यातील 'आश्‍विनी पौर्णिमा' म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2020). चंद्रमंडळातून स्वत:लक्ष्मीदेवी पृथ्वीवर उतरते आणि 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत पृथ्वीवर फिरते. अवघा मानवी समाज पृथ्वीवर काय काम करतो हे पाहण्याचा प्रयत्न करते, असे मानले जात आहे. या दिवशी लक्ष्मी पृथ्वीलावावर संचार करते अशीच अनेकांची धारणा असल्याने या दिवशी आटवलेल्या दुधात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर अशा गोष्टी घातल्या जातात. त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवला जातो. या दूधात चंद्राची किरणे पडावीत आणि मग ते दूध आपल्याला प्यायला मिळावे, असा समज आहे. त्यासाठी रात्री उशीरपर्यंत जागरणही केले जाते. आपणासही आपल्या आप्तेष्टांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी HD Greetings, Wallpapers, Wishes इथे आहेत. ज्या डाऊनलोड करुन आपण कोजागिरीचा आनंद साजरा करु शकता.

बदलत्या काळासोबत कोजागिरीचे स्वरुपही बदलले आहे. पूर्वी ठरलेल्या दिवशीच कोजागिरी साजरी व्हायची. आजही होते. परंतू, काही नागरिक काम, व्यवसाय यांच्या धबडग्यामध्ये आपल्या सोईनुसार कोजागिरी पोर्णिमा साजरी करतात. कधीकधी वर्षातील कोणत्याही दिवशी घरांच्या गच्चीवर जाऊन किंवा चंद्राच्या प्रकाशात जाऊन लोक एकत्र येतात आणि दूध पितात. त्यामुळे आताशा सण उत्सवांचे तितके आप्रूप लोकांना राहिले नाही. फरक इतकाच की शुभेच्छा मात्र लोक पंचांगानुसारच एकमेकांना देत राहतात.