Happy Kisan Diwas 2020 Photos : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या सर्वांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, रात्र-दिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानात 2001 पासून आजचा दिवस म्हणजेच 23 डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, यावर्षी संपूर्ण देशावर कोरोना संकट वावरत असतानाही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शुभेच्छा देता येणार आहे. यासाठी खालील HD Images फायदेशीर ठरणार आहेत.
शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे. हे देखील वाचा- Kisan Diwas 2020 Messages: किसान दिवस निमित्त बळीराजाबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, Wishes
किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-
किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-
किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-
किसान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा-
चरण सिंह यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 1923 मध्ये विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. 1925 मध्ये आग्रा विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या त्यांनी गाजियाबाद येथून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. चरण सिंह 1929 मध्ये राजकारणात सक्रिय झाले.दरम्यान, त्यांनी लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये राहून आत्मविश्वास मिळवला. ज्यामुळे त्यांची ज्याने ताकद वाढली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.