
भारत आज आपला 75 वा स्वातंत्र्य दिन ( Independence Day 2022) साजरा करतो आहे. अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेईल असा हा दिवस. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा देश हे स्वातंत्र्य कितीपत टिकवेल याबाबत अनेकांनी शंका उत्पन्न केल्या होत्या. काळाच्या कसोटीवर आजवर तरी भारताचे स्वातंत्र्य अबादीत राहिले. यापुढेही राहिल. याचसाठी भारत प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन (Happy Independence Day 2022 HD Images) साजरा करतो. यंदा तर भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष. त्यामुळे हा भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. केंद्र सरकारने तर 'आजादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) ही एक मोहिमत हाती घेतली आहे. त्यांतर्गत 'हर घर तिरंगा' ही मोहीमही चालवली जात आहे. या खास दिवशी, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. तर असा हा खास स्वातंत्र्य दिन व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers शेअर करून आपण साजरा करु शकता.
स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी महत्त्वाची कारणे म्हणजे भारताला मिळालेले स्वातंत्र्य ही कोणाची भेट नव्हे तर भारतीय नागरिकांने प्राणाची बाजी लावून मिळवलेला तो अलंकार आहे. त्यामुळे तो प्राणपणाने जपायला हवा याची जाणीव नागरिकांच्या मनात सतत जागृत ठेवणे. दुसऱे असे की, भूतकाळात अनेक चुका घडल्या. ज्याने स्वातंत्र्य धोक्यात आले. देशाच्या प्रगतिलाही खिळ बसली. त्यामुळे यापुढे अशा चुका टाळणे. जेणेकरुन भारताच्या प्रगतिला बाधा येणार नाही. नागरिकांचे स्वातंत्र्य कायम राहिल. भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी देशवासियांनी एकजुटीने राहिले पाहिजे. देशावर आलेल्या कोणत्याही संकटांना एकजुटीने सामोरे जाता यावे यासाठी देशवासियांच्या मनात देशभ्रेमाची ज्योत कायम ठेवणे,अशी अनेक कारणे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासापाठिमागे असतात. (हेही वाचा, Happy Independence Day 2022 Messages: ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खास मराठी Quotes, Wishes, Images, WhatsApp Status शेअर करत द्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा)
आजादी का अमृत महोत्सव: स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आजादी का अमृत महोत्सव: स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आजादी का अमृत महोत्सव: स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आजादी का अमृत महोत्सव: स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आजादी का अमृत महोत्सव: स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आजादी का अमृत महोत्सव: स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आणखीही एक महत्त्वाचे कारण म्हणजे स्वातंत्र्याचा लढा लढलेल्या शेकडो क्रांतीराकरकांच्या कार्याला सलाम करणे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरी, नेताजी सुभाष चंद्र बोस, खान अब्दुल गफारखान, दादाभाई नौरोजी, भगतसींग, चंद्र शेखर आझाद, लोकमान्य टीळक यांच्यासह तमाम क्रांतीकारकांचा समावेश आहे. या सर्व क्रांतीकारक, नेते आणि तत्कालीन चळवळीत निष्ठेने राहिलेल्या नागरिकांचा आणि लढवय्यांच्या कार्याला सलाम करणे हा सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यापाठी महत्त्वाचा उद्देश असतो.