76th Independence Day Quotes: भारत यावर्षी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव (Azadi Ka Amrit Mohotsav) साजरा करत आहे. कारण आपला देश स्वातंत्र्य होवून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याच्या या सुवर्ण महोत्सवी देशातील नागरिकांकडून, सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. भारत सरकारकडून विशेष हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहिम राबण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तरी या मोहिमेनुसार प्रत्येकाने आपल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट (August) दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवायचा आहे. तसेच ही मोहिम डिजीटल (Digital) स्वरुपातून पण राबवू शकता येणार आहे. म्हणजेच तुमच्या सोशल मिडीया प्लाटफॉर्मचे (Social Media) डिसप्ले पिक्चरवर (Display Picture) तुम्ही तिरंगा ठेवू शकता.
म्हणजेच यावर्षीचा स्वातंत्र्यदिन आमण डिडीटल माध्यमातून देखील साजरा करणार आहोत. तर देशाच्या या सुवर्ण महोत्सवी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह नातेवाईकांना या वर्षी खास डिजीटल शुभेच्छा देवून तुमचा स्वातंत्र्यदिन (Independence Day) विशेष करु शकता. स्वातंत्र्यदिन हा संपूर्ण देशाचा उत्सव आहे आणि तो धुमधडाक्यात साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे. भारताच्या सुवर्णमहोत्सवी आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या खास शुभेच्छा घेवून आलो आहोत. या शुभेच्छा तुम्ही तुमच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून सहज शेअर करु शकता. (हे ही वाचा:- Har Ghar Tiranga: Social Media च्या Profile Picture वर तिरंगा ठेवण्याचं पंतप्रधान मोदींच आवाहन, Whats App, Facebook, Instagram सह Twitter चा 'असा' बदला प्रोफाईल पिक्चर)
रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा,
उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,
जयघोष भारताचा आसमंती गुजावा,
सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,
स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करुया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेचं भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा आज आभाळी सजला
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा देश घडवला
७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
रुप, रंग, वेष, भाषा जरी आहेत अनेक
तरी आम्ही सारे भारतीय आहोत एक
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!